
राष्ट्रीय युवा महोत्सवात शिवाजी विद्यापीठाची ‘सुवर्ण’ कामगिरी
फोटो (86770
86771)
................
राष्ट्रीय युवा महोत्सवात
विद्यापीठाची ‘सुवर्ण’ कामगिरी
बंगळूर येथील जैन विद्यापीठामध्ये आयोजन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ ः बंगळूर येथील जैन विद्यापीठामध्ये २४ ते २८ फेब्रुवारीदरम्यान ३६ वा राष्ट्रीय युवा महोत्सव उत्साहात पार पडला. त्यात शिवाजी विद्यापीठाच्या संघाने रॅली, लोकनृत्य, पाश्चिमात्य समूहगीत आणि लोकवाद्यवृंद प्रकारात सहभागी होत तीन सुवर्ण, तर एक रौप्यपदकाची कमाई केली.
या महोत्सवात विद्यापीठाच्या संघाने रॅली, लोकनृत्य, पाश्चिमात्य समूहगीत प्रकारात प्रथम क्रमांक आणि लोकवाद्यवृंद प्रकारात तृतीय क्रमांक मिळविला. या संघाने लोकनृत्य प्रकारात सादर केलेल्या ‘ढोलू कुनिथा’ नृत्यास महोत्सवाच्या ३६ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच सुवर्णपदक मिळाले. विद्यापीठ संघातील २५ विद्यार्थ्यांना सुवर्ण आणि ९ जणांना रौप्यपदक मिळाले.
या संघाला कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. दरम्यान, या संघासोबत युवा महोत्सव समिती सदस्य म्हणून प्राचार्य डॉ. आर. जी. कुलकर्णी (नथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय, सांगली), डॉ. प्रकाश गायकवाड (संचालक, विद्यार्थी विकास विभाग उपस्थित होते. संघ व्यवस्थापक म्हणून शीला मोहिते (मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालय, कडेगांव), सुरेश मोरे (वरिष्ठ सहाय्यक, विद्यार्थी विकास विभाग) यांनी काम पाहिले.