वनस्पतीजन्य रंगांची निर्मिती

वनस्पतीजन्य रंगांची निर्मिती

86915
कोल्हापूर : कार्यशाळेत तयार करण्यात आलेले वनस्पतीजन्य रंग.


यंदा स्वयंमनिर्मित वनस्पतीजन्य रंगांची उधळण
‘निसर्गमित्र’कडून प्रबोधन; जिल्ह्यातील पाच हजार कुटुंबामध्ये रंगांची निर्मिती
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ : दलितमित्र बापूसाहेब पाटील ग्रंथालय संचलित निसर्गमित्र परिवार व आदर्श सहेली मंचतर्फे यंदा स्वयंनिर्मित वनस्पतीजन्य रंगांची उधळण होणार आहे. जिल्ह्यातील पाच हजाराहून अधिक कुटुंबीयांनी या रंगांची निर्मिती केली असून ही कुटुंबं या रंगांचा वापर करणार असल्याची माहिती निसर्गमित्र संस्थेचे कार्यवाह अनिल चौगुले, राणिता चौगुले यांनी दिली.
मागील पंधरा वर्षांमध्ये सातत्याने बालचमूनच्या चेहरा रंगवणे, वनस्पतीजन्य रंग वापरून पाककला स्पर्धा, शाडूच्या गणेश मूर्ती रंगवण्यासाठी वनस्पतीजन्य रंगांचा वापर, टिकाऊ खाद्यपदार्थांमध्ये वनस्पतीजन्य रंगांचा वापर आदी माध्यमातून प्रबोधन सुरू होते. त्यामुळे आता ही चळवळ यशस्वी होवू लागली आहे.
आदर्श सहेली मंचच्या महिलांकडून दरवर्षी शक्य तितक्या प्रमाणामध्ये हे रंग तयार व्हायचे. पण, लोकसंख्येच्या तुलनेत त्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे ही कमतरता भरून काढण्यासाठी कोल्हापूर शहर व जिल्ह्यातील बारा तालुक्यांमध्ये वनस्पतीजन्य रंग बनवण्याचे प्रात्यक्षिक, त्यांचा वापर व महत्त्व पटवून देण्यात आले. रंग तयार करण्यासाठी बेल, शेंद्री, पळस, काटेसावर, जांभूळ, कडूलिंब, झेंडू, गुलाब, हळद, हिरडा, बेहडा, आवळा आदी चाळीस वनस्पतींचा वापर केला आहे. मंचच्या महिलांकडून एक हजार किलो वनस्पतीजन्य रंग तयार झाले आहेत. रंग निर्माण करणाऱ्या वनस्पतींची रोपेही तयार करण्यात आली आहेत. या उपक्रमासाठी युवराज तिकोणे, शामराव कांबळे, आनंद ठोंबरे, डॉ. विजय मगरे, संजय बुटाले, अनिल मगर, संदीप पाटील, पराग केमकर, शहाजी माळी, विजय ओतारी, अमोल सरनाईक आदींचे सहकार्य मिळाले. दरम्यान, संस्थेच्या महालक्ष्मीनगर येथील कार्यालयात हे रंग उपलब्ध आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com