ए.एस.ट्रेडर्स १२ जणांचा जामीन फेटाळला

ए.एस.ट्रेडर्स १२ जणांचा जामीन फेटाळला

बारा संशयितांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

ए. एस.ट्रेडर्स ः १४ पैकी एक अटक, एकास जामीन मंजूर

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. ४ ः जादा परताव्याच्या अमिषाने गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या ए.एस. ट्रेडर्स कंपनीच्या १२ संशयित आरोपींचा अटकपूर्व जामीन आज फेटाळण्यात आला. जिल्हा न्यायाधीश (वर्ग चार) एस. पी. गोंधळेकर यांच्या न्यायालयात आज हा निर्णय झाला.
दरम्यान, यापूर्वीच एका संशयित आरोपीला अटक झाली आहे. तर दुसऱ्या एकाला आज अटकपूर्व जामीन मंजूर झाला.
अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेल्या १४ संशयितांपैकी शिवाजी धोंडीराम शिंदे (रा. खुपिरे, ता. करवीर) याचा अर्ज न्यायालयाने मंजूर केला. तसेच विक्रम जोतिराम नाळे (रा. सांगरुळ, ता. करवीर) याला काही दिवसांपूर्वीच शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे.
जादा परतावा देण्याची हमी देवूनही तो परतावा दिला नाही, यासह अन्य कारणांवरून ए.एस.ट्रेडर्सच्या संचालक, एजंटावर गुंतवणूकदारांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला आहे. गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ए.एस. ट्रेडर्सचे संचालक आणि एजंट अशा एकूण २७ संशयितांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. यापैकी १४ संशयितांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता. त्यामध्ये एकाला अटक झाली आहे. तर उर्वरीत संचालक- एजंटांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. त्यापैकी १२ जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज आज जिल्हा न्यायाधीश गोंधळेकर यांनी फेटाळला. त्यामुळे त्यांना केंव्हाही अटक होऊ शकते. त्यानंतर तपासाला खऱ्या अर्थाने गती येण्याची शक्यता आहे. फिर्यादी रोहित ओतारी यांचे वकील महंतेश कोले आणि सरकारी वकील ए. ए. पिरजादे यांनी युक्तिवाद केला.
दरम्यान, गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांची चौकशी करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे क्षत्रिय मराठा रियासत संघटनेने आज पोलिस अधीक्षकांकडे केली.
--------
या १२ संशयितांचा जामीन अर्ज फेटाळला

लोहितसिंग धर्मासिंग सुभेदार (रा. पलूस, जि. सांगली), रवींद्र प्रदीपराव देसाई (रा. नागाळा पार्क, कोल्हापूर), सागर पंडितराव पाटील (रा. पाटील गल्ली, सांगली), अभिजीत साहेबराव शेळके (रा. शाहूपुरी, कोल्हापूर), चांदसो काझी (रा. माळ्याची शिरोली, ता. करवीर), अमित शिंदे, युवराज तानाजी खेडेकर, दत्तात्रय विश्वनाथ तोडकर (दोघे रा. येडेमच्छिंद्र, ता. वाळवा, जि. सांगली), महेश बाजीराव आरेकर-पाटील, दीपक बाबूराव मोहिते (दोघे रा. आरे, ता. करवीर), संतोष नंदकुमार कुंभार (रा. दत्तनगर, पलूस, जि. सांगली) आणि विजय जोतिराम पाटील (रा. शिंदेवाडी, खुपिरे, ता. करवीर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com