कार्यशाळा

कार्यशाळा

87126

‘केएमसी’ कॉलेजमध्ये
माहिती अधिकार कार्यशाळा

कोल्हापूर, ता. ५ ः ‘‘नागरिकांचा शासन कारभारात सहभाग वाढविणे व प्रशासनात पारदर्शकता आणणे हे माहिती अधिकाराचे मुख्य काम आहे, असे यशदा येथील संशोधन अधिकारी दादु बुळे यांनी सांगितले.
महापालिकेच्यावतीने केएमसी कॉलेज येथे माहिती अधिकार अधिनियम २००५ विषयी अधिकारी व कर्मचाऱ्यांची कार्यशाळा झाली. यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधनी (यशदा) यांच्यामार्फत कर्मचाऱ्यांना माहिती अधिकार पुस्तकाचे वाटप करून मार्गदर्शन केले. बुळे यांनी नागरिकांना माहिती कळविणे हे माहिती अधिकाराचे प्रथम कर्तव्य आहे असे सांगत माहिती अधिकार अधिनियमाची विविध कलमांविषयी मार्गदर्शन केले. माहिती अधिकार मास्टर ट्रेनर रेखा साळोखे यांनी माहिती अधिकारविषयी महत्वाची कलमे व त्यांचे उपयोगविषयी मार्गदर्शन केले. शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, वरिष्ठ लेखापरिक्षक वर्षा परीट, मिलिंद कुंभार, उपशहर अभियंता नारायण भोसले, एन. एस. पाटील, सतीश फप्पे, रमेश कांबळे, उपशहर रचनाकार रमेश मस्कर, कामगार अधिकारी तेजश्री शिंदे, रवका अधिकारी प्रशांत पंडत, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे आदी उपस्थित होते. उपायुक्त शिल्पा दरेकर यांनी स्वागत झाले. अधीक्षक राम काटकर यांनी प्रास्ताविक केले विजय वणकुद्रे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com