महावीर

महावीर

87161
कोल्हापूर ः महावीर महाविद्यालयात मार्गदर्शन करताना प्रा. प्रसन्ना करमरकर. शेजारी प्रा. जयवंत दळवी व अन्य.

आवड, क्षमता ओळखून
करिअर निवडा ः डॉ. करमरकर

कोल्हापूर, ता. ५ ः तणाव ही कमी न होणारी मानसिक प्रक्रिया आहे; परंतु तिचे नियंत्रण करता येते. समस्या वाढतच राहतात. त्या तात्कालिक असतात. त्याच्यावरती आत्महत्या हा कायमस्वरूपी उपाय होऊ शकत नाही. कोणत्याही क्षेत्रात काम करण्यापूर्वी आपली आवड शोधा आणि त्याप्रमाणे करिअरमध्ये उतरा. स्वतःची आवड व क्षमता ओळखून करिअर निवडा, असे आवाहन शिवाजी विद्यापीठातील संगणक शास्त्र विभागातील प्रा. प्रसन्ना करमरकर यांनी केले.
महावीर महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या महावीर महाविद्यालयाच्या अभ्यास केंद्रात ‘करिअर’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी केंद्र संयोजक प्रा. जयवंत दळवी होते. प्रा. व्ही. एम. पाटील प्रमुख उपस्थित होते.
प्रा. करमरकर म्हणाले, ‘आजच्या पिढीवर बाह्य गोष्टींचा एवढा मोठा परिणाम झालेला आहे की, कोणत्याही क्षेत्रातील संधींचा कालखंड मर्यादित असतो. त्यामुळे स्वतःचा शोध घेण्याची प्रक्रिया विद्यार्थी करतच नाही. स्वतःची क्षमता न ओळखता करिअर निवडल्यास नैराश्य येते आणि जीवनाकडे बघण्याचा नकारात्मक दृष्टिकोन तयार होतो. नैराश्य येऊ द्यायचे नसेल तर स्वतःची क्षमता ओळखा, वेगवेगळे प्रयोग करीत सराव करत राहा, व्यक्त होत राहा. सकारात्मक ऊर्जा निर्माण करणाऱ्या पर्यावरणामध्ये राहा. ऊर्जा ऊर्जेला आकर्षित करते. फक्त बुद्धिमान होऊ नका. धाडसी व्हा.’
स्वागत व प्रास्ताविक प्रा. रुपेश हळदकरांनी केले. आभार प्रा. नेताजी गिरी यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com