सतेज पाटील- विधान परिषद प्रश्न

सतेज पाटील- विधान परिषद प्रश्न

पाणीपुरवठा, सहकारी
संस्थांना अनुदान द्यावे

सतेज पाटील यांची विधान परिषदेत मागणी

कोल्हापूर, ता. ७ ः राज्यातील सहकारी पाणीपुरवठा संस्थांच्या अनुदानाचा प्रश्‍न आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत उपस्थित केला. एक जानेवारी १९९४ रोजी ज्या संस्थांची कर्जप्रकरणे वित्तीय संस्थांकडे प्रलंबित होती, तसेच उभारणी झाली नव्हती, अशा संस्था अनुदानासाठी पात्र आहेत. १९९४ पूर्वी स्थापन झालेल्या राज्यातील सहकारी पाणीपुरवठा संस्थांच्या अनुदानासंदर्भातील तक्रारी सहकार विभागाकडे प्राप्त झाल्या नसल्याचे सहकारमंत्री अतुल सावे यांनी सांगितले.
सहकारी तत्त्वावर उभारण्यात आलेल्या उपसा जलसिंचन योजनांच्या प्रकल्प खर्चाचा लाभधारक शेतकरी सभासदांवरील बोजा कमी करण्यासाठी १९ नोव्हेंबर १९९४ रोजीच्या शासन निर्णयानुसार प्रकल्प खर्चाच्या पंचवीस टक्के किंवा अकरा कोटी रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल, ती अनुदानाच्या स्वरूपात दिली जात असल्याचेही मंत्री श्री. सावे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com