तनवडी मठाला सर्वतोपरी सहकार्य; आमदार पाटील

तनवडी मठाला सर्वतोपरी सहकार्य; आमदार पाटील

87475
तनवडी : प्रवचनकार श्री निजगुणी देवरू यांच्यावर पुष्पवृष्टी करताना उदयकुमार देसाई, भगवानगिरी महाराज, बसवराज आरबोळे, गुरगोंडा पाटील आदी.

तनवडी मठाला सर्वतोपरी सहकार्य
आमदार पाटील; ज्ञानदासोह सोहळ्याची गुग्गुळोत्सवाने सांगता
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ७ : तनवडीच्या श्री कमलेश्‍वर मठाचे सामाजिक कार्य मोठे आहे. या मठाच्या सांस्कृतिक हॉलसाठी आठ लाखांचा निधी दिला आहे. त्याचा प्रारंभ झाला असून, यापुढेही मठाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही आमदार राजेश पाटील यांनी दिली.
कमलेश्‍वर मठातर्फे आठवडाभर सुरू असलेल्या ज्ञानदासोह व महादासोह सोहळ्याच्या सांगता कार्यक्रमात ते बोलत होते. नूलचे श्री गुरुसिद्धेश्‍वर स्वामी, हिटणीचे श्री प्रभुलिंगेश्‍वर स्वामीजी, श्री भगवानगिरी महाराज, निडसोशी मठाचे उत्तराधिकारी श्री निजलिंग देवरू, प्रवचकार श्री निजगुणी देवरू यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी श्री. गुरुसिद्धेश्‍वर स्वामीजींनी कमलेश्‍वर मठ म्हणजे ज्ञानदासोहचे केंद्र झाल्याचे मत व्यक्त केले. श्री भगवानगिरी महाराज, श्री निजलिंग देवरू, श्री प्रभुलिंगेश्‍वर, प्रवचनकार निजगुणी देवरू यांचीही भाषणे झाली. मठाचे प्रमुख उदयकुमार देसाई यांनी प्रास्ताविकात मठाच्या कार्याचा आढावा घेतला.
सांगता कार्यक्रमात १२० जोड्यांच्या सहभागाने गुग्गुळोत्सव झाला. नूलच्या श्री गुरुसिद्धेश्‍वर स्वामीजींची वाद्यांच्या गजरात हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली. गोडसाखर संचालक दिग्विजय कुराडे, शिवराज पाटील, अरुण गवळी, अशोक मेंडुले, मंगल आरबोळे यांचा सत्कार झाला. या सोहळ्यात श्री निजगुणी देवरू यांचे प्रवचन झाले. त्याबद्दल त्यांची पूजा व सत्कार करण्यात आला. हजारो महिलांची ओटी भरणी केली. रोज महाप्रसादाचे वाटप झाले. क्रिकेट, कबड्डी स्पर्धा झाल्या. बी. एस. पाटील यांनी आभार मानले. या वेळी मारुती पाटील, दुंडाप्पा पाटील, बसवाणी पाटील, बसवराज आरबोळे, पांडूरंग पाटील, मल्लिकार्जुन आरबोळे, आप्पासाहेब पाटील, गुरगोंडा पाटील, अर्जून सुतार, कलाप्पा देसाई, आण्णासाहेब देसाई, जयसिंग चव्हाण, अमर चव्हाण, बाबासाहेब पाटील, अभय देसाई, बाबुराव चौगुले आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com