डिगे फाऊंडेशनतर्फे पुरस्कार जाहिर

डिगे फाऊंडेशनतर्फे पुरस्कार जाहिर

डिगे फाऊंडेशनच्या
पुरस्काराचे गुरुवारी वितरण
कोल्हापूर, ता. ८ : तथागत गौतम बुध्द, छत्रपती शिवराय, क्रांतिबा जोतिराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवर्तनवादी विचारांवर कार्य करणाऱ्या व्यक्तींना डिगे फाऊंडेशनतर्फे ‘समाजरत्न भीमक्रांती’ राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते, अशी माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष सदानंद डिगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
श्री. डिगे म्हणाले, ‘‘समाजरत्न भीमक्रांती पुरस्कार माजी महापौर निलोफर आजरेकर, डॉ. आंबेडकर कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड अर्थशास्त्र, वडाळा मुंबई येथील प्रभारी प्राचार्या प्रा. डॉ. यशोधरा वराळे, विद्यालक्ष्मी राजहंस, शिरोली माळ्याची येथील श्री बा. पुं. पाटील माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सहाय्यक शिक्षिका छाया वर्धन, सडोली खालसा केंद्रशाळेतील हेमलता कुर्डुकर, स्वाती काळे, यवलुज कन्या विद्यामंदिरच्या मनीषा घरपणकर, प्रा. अनिजा सूर्यवंशी यांना देण्यात येईल. पुरस्कार वितरण डॉ. बाबासाहेब आंबेकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त भीम फेस्टिव्हलअंतर्गत गुरूवारी (ता. १३) दुपारी तीन वाजता शाहू स्मारक भवनात होईल.’’ पत्रकार परिषदेला अशोक भास्कर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com