
आमदार जयश्री जाधव महिला दिन
87742
महिलांनो निर्भय, जागृत
बना ः सरोज पाटील
कोल्हापूर, ता. ८ ः स्त्री-पुरुष असा भेदभाव न करता स्त्रियांना समान वागणूक देणे गरजेचे आहे. यासाठी समानतेची सुरुवात स्वतः च्या घरापासून करा. स्त्रियांनी आपली जागरुकता आणि समानता स्वतःच जपली पाहिजे. स्त्रियांना मिळणारे हक्क त्यांनी नाकारू नये. महिलांनी निर्भय होणे, जागृत होणे तसेच वाचन आणि विचार करणे ही काळाची गरज आहे, असे मत अनिसच्या अध्यक्षा सरोज पाटील यांनी व्यक्त केले.
जयश्री चंद्रकांत (आण्णा) जाधव फाउंडेशनतर्फे सुप्रिया चौगुले, स्नेहा गिरी, नसिमा हुरजूक, ऐश्वर्या जाधव, डॉ. सुषमा जगताप, उज्ज्वला खेबुडकर, स्मिता खामकर, विद्या माने, कांचनताई परुळेकर, डॉ. मंजुश्री रोहिदास यांना सन्मान स्त्री शक्तीचा पुरस्काराने गौरविले. या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी शांतादेवी डी. पाटील, डॉ. गीता पिल्लाई, उपायुक्त टिना गवळी, फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. दश्मिता जाधव, माजी महापौर निलोफर आजरेकर उपस्थित होत्या. शाहू स्मारक भवन येथे हा सोहळा झाला.
दरम्यान, पाककला, फ्रूट डेकोरेशन, फ्लॉवर डेकोरेशन, सॅलड, रांगोळी, मेहंदी, केशभूषा, वेशभूषा, खेळ पैठणीचा, लहान मुलींसाठी चित्रकला स्पर्धांमधील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. महिला कॉंग्रेस शहराध्यक्ष संध्या घोटणे, नगरसेविका वृषाली कदम, पूजा नाईकनवरे, उमा बनछोडे, माधुरी लाड, छाया पवार, शोभा कवाळे, अश्विनी बारामते, दीपा मगदूम, महेरजबीन सुभेदार, जयश्री चव्हाण उपस्थित होत्या.