शिवाजी विद्यापीठाचे आज ‘बजेट’

शिवाजी विद्यापीठाचे आज ‘बजेट’

शिवाजी विद्यापीठाचे आज ‘बजेट’
कोल्हापूर ः शिवाजी विद्यापीठाची सिनेट (अधिसभा) उद्या, शुक्रवारी विद्यापीठातील राजर्षी शाहू सभागृहात दुपारी १२ वाजता सुरू होईल. त्यामध्ये सन २०२३-२०२४ यावर्षातील ५३८ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाचे (बजेट) सादरीकरण होणार आहे. नव्या सिनेट आणि इतर अधिकार मंडळांची स्थापना झाल्यानंतरचे हे पहिलेच बजेट असल्याने त्याकडे प्राचार्य, अधिविभागप्रमुख, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी या घटकांचे लक्ष लागले आहे.
या सिनेटच्या बैठकीत प्रश्‍नोत्तराचा तास संपल्यानंतर अंदाजपत्रकाचे सादरीकरण होईल. त्यावरील काही प्रश्‍नांबरोबरच अन्य काही मुद्यांवर चर्चा रंगणार आहे. त्यात तक्रार निवारण समितीकडे प्रलंबित असलेली प्रकरणे, गरजेपेक्षा जादा प्रमाणात नियुक्त केलेले रोजंदारी कर्मचारी आणि त्यांच्या मानधनावर होणारा खर्च, कोरोना काळातील ऑनलाईन परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांनी प्रमाद केला त्याबाबतची दंड आकारणी सक्षम प्रमाद समितीसमोर न जाता करणे, शिक्षकांच्या स्थान निश्‍चितीची प्रकरणे नाकारणे आदी मुद्दांचा समावेश आहे. दरम्यान, गेल्यावर्षी विद्यापीठाने ५१९ कोटी ४ लाख रूपयांचे अंदाजपत्रक सिनेटच्या बैठकीत मंजूर झाले होते. त्यातील ८ कोटी ८२ लाख रूपयांची तूट ही विद्यापीठ निधीतील शिलकीमधून भरून काढली. या अंदाजपत्रकात संशोधन, गुणवत्ता शिष्यवृत्ती, वसतिगृह, इनडोअर स्पोर्टस्‌ कॉम्प्लेक्स आदींसाठी तरतूद केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com