प्रोत्साहन योजना

प्रोत्साहन योजना

तेरा हजार शेतकऱ्यांचे अनुदान लटकले

प्रोत्साहनात्मक रक्कम : पहिल्या, दुसऱ्या यादीतील शेतकऱ्यांना प्रतीक्षा

सुनील पाटील, सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. १० : महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत पाहिल्या आणि दुसऱ्या यादीतील तब्बल १३ हजार १६ शेतकऱ्यांना अद्यापही अनुदानाची रक्कम मिळालेली नाही. खाते किंवा आधार प्रमाणीकरण होवूनही या शेतकऱ्यांच्या नावावर रक्कम जमा झालेली नाही.
कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ७१ शेतकऱ्यांना ६२५ कोटी रुपये मिळाले आहेत. मात्र, पहिल्या आणि दुसऱ्या यादीतील हजारो शेतकऱ्यांना याचा लाभ मिळालेला नाही. आधार प्रमाणीकरण, बँक खाते क्रमांक, बँकेचा आएएफसी कोड नंबर भरताना चूक केली असल्यास खात्यावर पैसे जमा केलेले नाही. दरम्यान, जिल्ह्यातील १३ हजार १६ शेतकऱ्यांच्या सर्व खात्यांची पूर्ण माहिती भरली आहे. त्यांना अद्यापही या रक्कमेचा लाभ मिळालेला नाही. आतापर्यंत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगली रक्कम मिळाली आहे. ६२५ कोटी रुपये सर्व शेतकऱ्यांना मिळाले आहेत. यामध्ये जास्तीजास्त पन्नास हजार रुपयांपर्यंत रक्कम मिळाली आहे. आता ज्यांचे खाते प्रमाणीकरण झालले आहेत, त्यांना तत्काळ ही रक्कम मिळाली पाहिजे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होते आहे. काल अधिवेशनातही शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांपर्यंत अनुदान दिल्याची माहिती सरकारच्यावतीने दिली. यात दुमत नाही. आता ज्या-ज्या शेतकऱ्यांना अद्याप पहिल्या किंवा दुसऱ्या यादीत नावे आलेली नाही, अशा सर्व शेतकऱ्यांची तिसरी यादी प्रसिध्द केली पाहिजे. याशिवाय, पहिल्या आणि दुसऱ्या यादीत पात्र असूनही ज्यांना रक्कम मिळालेली नाही. त्या सर्व शेतकऱ्यांना ताबडतोब रक्कम दिली पाहिजे. गेल्या सहा ते सात महिन्यांपासून या रक्कमेची वाट पाहत आहे. ही रक्कम मिळाली असती तर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असता.सध्या शेतीची कामे सुरु आहेत. यासाठी ही रक्कम वापरता आली असती. त्यामुळे शासनाने या रक्कमेबाबत सकारात्मक निर्णय घेवून शेतकऱ्यांना अनुदान द्यावे, अशी मागणी होत आहे.
....

‘पहिल्या - दुसऱ्या यादीतील पात्र शेतकऱ्यांना अद्यापही अनुदानाची रक्कम मिळालेली नाही. याची संख्या मोठी आहे. त्यामुळे शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देवून ज्यांची नावे पात्र ठरली आहेत, त्यांना तत्काळ रक्कम दिली पाहिजे. तसेच, ज्यांची नावे पहिल्या आणि दुसऱ्या यादीत आलेली नाहीत, त्यांची तिसरी यादी जाहीर केली पाहिजे.

शंकर पाटील, शेतकरी
....

‘जिल्ह्यात पहिल्या आणि दुसऱ्या यादीतील पात्र शेतकऱ्यांना रक्कम पाठविण्याचे काम सुरु आहे. शासनाकडून रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे.
निलकंठ करे, जिल्हा उपनिबंधक
...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com