मराठी भाषा पंधरवडा

मराठी भाषा पंधरवडा

88248

मातृभाषेतूनच संस्कारशील
विद्यार्थी घडतात ः चव्हाण

कोल्हापूर, ता. १२ ः मातृभाषेतूनच संस्कारशील विद्यार्थी घडतात, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी सांगितले. ते जिल्हा मराठी भाषा समिती, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या मराठी भाषा संवर्धन पंधरवडा दिनानिमित्त घेतलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरणप्रसंगी बोलत होते.
साहित्यिक प्रा. डॉ. रणधीर शिंदे म्हणाले, ‘‘मराठी भाषेला प्राचीन इतिहास असून, या भाषेचे संवर्धन आणि संरक्षण होणे काळाची गरज आहे. आधुनिक काळात मातृभाषेचे महत्त्व पटवून देणे ही खरी गरज आहे.’’ माध्यमिक शिक्षण अधिकारी एकनाथ आंबोकर, मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. मराठी अध्यापक संघाचे सदस्य संजय साबळे यांच्या ‘शाळा विद्यार्थी आणि मी’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. शिक्षण विस्ताराधिकारी विजय ओतारी, बी एस कांबळे, नेताजी डोंगळे, विजय सरगर, शशिकांत बैलकर, एम एस पाटील, सूरज पाटील, जयश्री पिंगळे, छाया वर्धन उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर यांनी केले. सूत्रसंचालन सचिन यादव यांनी केले. आभार अरुण कुंभार यांनी मानले.


फोटो ओळी
कोल्हापूर ः मराठी भाषा संवर्धन पंधरावडा दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांच्या पारितोषक वितरण प्रसंगी बोलताना जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण. व्यासपीठावर शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, डॉ. रणधीर शिंदे, अपर्णा वाईकर, राजेंद्र पाटील आदी उपस्‍थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com