कमर्शिअल निवडणूक

कमर्शिअल निवडणूक

कमर्शिअल बँकेसाठी आज मतदान


कोल्हापूर, ता. ११ ः येथील कमर्शिअल बँकेसाठी उद्या (ता. १२) मतदान होत आहे. शाहूपुरी गवत मंडई परिसरातील आयर्विन ख्रिश्‍चन हायस्कूलच्या सभागृहात १८ केंद्रांवर सकाळी आठ ते सायंकाळी पाच यावेळेत मतदान होईल. मतमोजणी सोमवारी (ता. १३) सकाळी दहा वाजता बाजार समिती आवारातील शेतकरी भवनमध्ये होणार आहे. संचालकपदाच्या १४ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. यापैकी महिला प्रतिनिधी गटातील दोन तर इतर मागासवर्गीय प्रतिनिधी गटातील एक अशा तीन जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित ११ जागांसाठी १४ उमेदवार रिंगणात आहेत. बँकेचे सुमारे १८ हजार सभासद मतदानासाठी पात्र आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रदीप मालगांवे तर सहाय्यक म्हणून निलेश पाटील काम पहात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com