संक्षिप्त- विद्यापीठ शिक्षण संस्था

संक्षिप्त- विद्यापीठ शिक्षण संस्था

88435
कोल्हापूर : विद्यापीठ शिक्षण संस्थेच्या चेअरमनपदी ॲड. धनंजय पठाडे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करताना संस्थेचे सेक्रेटरी ॲड. प्रशांत चिटणीस सोबत व्‍हाईस चेअरमन वरूनराज शिंदे, देवेंद्र शिंदे, विजयकांत नगरशेठ, अजयसिंह चिले.

‘विद्यापीठ''च्या अध्यक्षपदी ॲड. पठाडे
कोल्हापूर : येथील विद्यापीठ शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी ॲड. धनंजय पठाडे यांची फेरनिवड झाली. २०२३ ते २०२८ या कालावधीसाठी ही निवड असून गेली अठ्ठावीस वर्षे ते संस्थेची धुरा सांभाळत आहेत. दरम्यान, संस्थेच्या उपाध्यक्षपदी वरुणराज शिंदे यांची निवड झाली. छत्रपती शाहू महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली (कै) दीक्षित गुरुजी आणि (कै) तोफखाने गुरुजी यांनी १९१७ ला संस्थेची स्थापना केली. विद्यापीठ हायस्कूल, एमएलजी हायस्कूल, तपोवन अशा अकरा शाळा आणि महाविद्यालयातून सध्या दहा हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. संस्थेचे माजी विद्यार्थी विविध क्षेत्रांत यशोलौकिकाचे शिलेदार ठरले असून ही परंपरा अधिक नेटाने पुढे नेली जाईल, असे ॲड. पठाडे यांनी सांगितले. या वेळी सचिव ॲड. प्रशांत चिटणीस, खजानीस देवेंद्र शिंदे, विजयकांत नगरशेठ, अजयसिंह चौले, प्रशासनाधिकारी प्रदीप मगदूम आदी उपस्थित होते.
-----------------------
88436
कोल्हापूर : आयकर महासंघाच्या वतीने आयकर भवनात आरोग्य शिबिर झाले.

आयकर महासंघातर्फे आरोग्य शिबिर
कोल्हापूर : आयकर विभागातील कर्मचाऱ्यांच्या नियमित आरोग्य तपासणीसाठी आयकर महासंघ आणि डायमंड हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने आयकर भवन येथे आरोग्य शिबिराचे आयोजन झाले. महासंघाचे सचिव स्वप्नील गायकवाड यांनी स्वागत केले. संयुक्त आयकर आयुक्त धनंजय महाजन यांनी मनोगत व्यक्त केले. शिबिरात सुमारे ऐंशी कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी झाली. या वेळी संयुक्त आयकर आयुक्त अविनाश करपे, आयकर अधिकारी नीरज यादव, एकनाथ पाटील, आयकर महासंघाचे अध्यक्ष कणाद एकसंबेकर, उपाध्यक्ष उमेश जाधव, खजिनदार सिद्धार्थ ढवळे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com