
कोले, पाटील यांचे बैल प्रथम
ich1216.jpg
88667
इचलकरंजी ः आमदार प्रकाश आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त लाकूड ओढण्याच्या शर्यती चुरशीने झाल्या.
-----------
कोले, पाटील यांचे बैल प्रथम
दोन गटात आयोजन; इचलकरंजीत लाकूड ओढण्याची शर्यत
इचलकरंजी, ता. १२ ः आमदार प्रकाश आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त राहुल आवाडे युवा शक्ती आणि आवाडे समर्थक यांच्यावतीने आयोजित भव्य लाकूड ओढण्याच्या शर्यतीत मोठ्या गटात प्रमोद आण्णासो कोले (२९ सेकंद) आणि लहान गटात भाऊसो पिरगोंडा पाटील (३१ सेकंद) यांच्या बैलांनी प्रथम क्रमांक मिळविला. रंगपंचमीनिमित्त सप्तरंगांची उधळण आणि तरुणाईचा सळसळता उत्साह अशा दुहेरी संगमात ही स्पर्धा मोठ्या उत्साहात झाली.
डीकेटीई नारायण मळा येथे या शर्यतीचा प्रारंभ माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे आणि गावभाग पोलिस ठाण्याचे निरिक्षक राजू ताशिलदार यांच्याहस्ते लाकूड पुजन करुन केला. कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना, ताराराणी पक्ष, विविध कार्यकारी सेवा सोसायटीतर्फे माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांचा तिथीनुसार वाढदिवस व आमदार प्रकाश आवाडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत दोघांचा सत्कार केला.
कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब चौगुले, केन कमिटी अध्यक्ष राहुल आवाडे, मोश्मी आवाडे, ताराराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, कारखान्याचे कार्यकारी संचालक मनोहर जोशी, संचालक दादासो सांगावे, जिनगोंडा पाटील, आण्णासो गोटखिंडे, सुरज बेडगे, शितल आम्मणावर, सुकुमार किणिंगे, सुमेरु पाटील, कमल पाटील, वंदना कुंभोजे, विविध कार्यकारी सोसायटीचे शिवाजी काळे, राजू चनविरे, सुरेंद्र कुंभार, बाबु रुग्गे, राजू दरीबे आदी उपस्थित होते.
------------
स्पर्धेचा निकाल
लाकूड ओढण्याच्या शर्यतीत दोन्ही गटात ३५ बैल सहभागी झाले होते. अत्यंत चुरशीने झालेल्या या स्पर्धेत तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहत होता. त्यातच रंगपंचमीमुळे या शर्यतीला आणखीन रंगत आली. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :- लहान गट : भाऊसो पिरगोंडा पाटील-प्रथम (३१ सेकंद), संदीप राजाराम कोळेकर -द्वितीय (३१.०३ सेकंद), फरहान किल्लेदार - तृतीय (३२.०६ सेकंद). मोठा गट : प्रमोद आण्णासो कोले-प्रथम (२९ सेकंद), अनिकेत रमेश पाटील - द्वितीय (२९.०२ सेकंद), सुहास आप्पासो शिंदे-तृतीय (३०.०३ सेकंद). स्पर्धेनंतर मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिस प्रदान करण्यात आले.