‘जुनी पेन्शन’च्या बेमुदत संपात ३० हजार शिक्षकांचा सहभाग

‘जुनी पेन्शन’च्या बेमुदत संपात ३० हजार शिक्षकांचा सहभाग

‘जुनी पेन्शन’च्या बेमुदत संपात
३० हजार शिक्षकांचा सहभाग

जिल्ह्यातील शाळा राहणार बंद ; दहावी, बारावीच्या परीक्षेचे काम करणार

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर,ता.१३ ः जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी उद्या, मंगळवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे ३० हजार शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होणार आहेत. शाळा बंद ठेवून ते संपात सहभागी होतील. मात्र, दहावी, बारावीच्या परीक्षेचे काम ते करणार आहेत.
महाराष्ट्र राज्य शासकीय मध्यवर्ती कर्मचारी संघटना व सर्व शासकीय निमशासकीय कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीने या बेमुदत संपाची हाक दिली आहे. त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील ३० हजार शिक्षक, कर्मचारी सहभागी होतील. संपात सहभागी झाले, तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून दहावी आणि बारावीच्या परीक्षेची सर्व कामे शिक्षक, कर्मचारी करणार आहेत. मात्र, ते मस्टरवर सह्या करणार नाहीत. याबाबतचा निर्णय कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या बैठकीत शनिवारी झाला आहे. त्यानुसार मंगळवारपासून संपाची सुरूवात केली जाईल, असे शैक्षणिक व्यासपीठाचे सदस्य भरत रसाळे यांनी सांगितले.
...

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा बहिष्कार

राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने राज्य मध्यवर्ती समन्वय समितीचा घटक असल्याने या पूर्वीच बेमुदत संपाची नोटीस दिली आहे. महासंघाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संपात सहभागी होतील. बारावीच्या परीक्षेबाबतच्या सर्व कामकाजावर आमचा बहिष्कार राहणार आहे. ते लक्षात घेवून शासनाने जुनी पेन्शन लागू करण्याबाबतचा तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाचे जिल्हा अध्यक्ष प्रा. टी. एस. दुर्गी, जिल्हा सचिव प्रा.संजय मोरे यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com