देवल क्लब मैफल

देवल क्लब मैफल

88873
देवल क्लबमध्ये
रंगली स्वरधारा मैफल
कोल्हापूर, ता. १३ ः गायन समाज देवल क्लब आणि बंगळूरच्या सप्तक संस्थेच्या वतीने स्वरधारा मैफल रंगली. ज्योती हेगडे यांनी रूद्रवीणा या प्राचीन वाद्यातून नाद सौंदर्याचे दर्शन घडवले. अनुजा बोराडे यांनी पखवाज साथ केली.
डॉ. पौर्णिमा धुमाळे यांनी आग्रा घराण्याच्या गायकीचे दर्शन घडले. त्यांनी मलुश केदार रागातील झुमरा तालातील बंदिशीने गायनाला प्रारंभ केला. बागेश्री बहार या अप्रचलित जोड रागामध्ये दोन बंदिशी सादर करून त्यांनी गायनाची सांगता केली. संजय देशपांडे यांनी तबला तर सुयोग कुंडलकर यांना हार्मोनियम साथ केली. देवल क्लबचे खजानीस राजेंद्र पित्रे, कार्यवाही सचिन पुरोहित, अजित कुलकर्णी, उमा नामजोशी यांच्या उपस्थितीत मैफलीला प्रारंभ झाला. सप्तक संस्थेच्या वतीने जी. एस. हेगडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी गौरी पाटील, कीर्ती कस्तुरे, डॉ. नंदकुमार जोशी, संस्थेचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील, डॉ. विनोद ठाकूरदेसाई, डॉ. भाग्यश्री मुळे, डॉ. शीतल धर्माधिकारी उपस्थित होते. श्रीकांत डिग्रजकर यांनी प्रास्ताविक केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com