आजरा ः गव्याच्या कळपाकडून नुकसान बातमी

आजरा ः गव्याच्या कळपाकडून नुकसान बातमी

89049

पेरणोली ः येथे गव्याच्या कळपाने शेतकरी नामदेव वांद्रेची फस्त केलेली उसाची लावण.
...

पेरणोली येथे गव्यांच्या कळपाचा धुमाकूळ

आजरा ः पेरणोली (ता. आजरा) येथे गव्यांच्या कळपाने धुमाकूळ घातला आहे. गवे उसाची लावण व खोडवा फस्त करीत आहेत. त्यांच्या उपद्रवाने शेतकरी हैराण झाले असून या कळपाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. ‘खडकओहळ’ नावाच्या शेतामध्ये गव्यांचा कळप उतरत आहे. हा कळप उसाची लावण व खोडवा यावर ताव मारत आहे. पिकाची राखण करून देखील कळप बधेनासा झाला आहे. शेतकऱ्यांनी गव्यांना हुसकावून लावण्यासाठी विविध उपाय अवलंबले आहेत. पण कळप शेतकऱ्यांना हुलकावणी देवून ऊस पिक फस्त करीत आहे. हा कळप नावकरवाडी परिसरातील जंगल भागात तळ ठोकून आहे. सायंकाळ होताच तो पिकात उतरतो व पिक फस्त करतो. या कळपाने नामदेव वांद्रे, सचिन वांद्रे, पांडुरंग वांद्रे, गणपती ढोकरे यासह अनेक शेतकऱ्यांच्या ऊस पिकाचे नुकसान केले आहे.
....

भुसुरुंगामुळे नुकसान, नुकसान भरपाईची मागणी

धामोड : धामणी मध्यम प्रकल्पातील सांडव्याच्या कामावरील शक्तिशाली भुसुरुंगाच्या स्फोटामुळे मानबेट (ता राधानगरी) ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या वाड्या वस्त्यांमध्ये विविध प्रकारचे नुकसान झाले आहे. भिंतीना तडे गेले आहेत. त्याची शासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे यांच्याकडे शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, धामणी प्रकल्पाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. संबंधित कंपनीकडून शक्तिशाली भूसुरुंगाचा वापर करण्यात येत आहे . त्यामुळे परिसरातील घरे, शाळा यासह पाणीपुरवठा करणाऱ्या योजना, कुपनलिका तसेच शेतातील पिके यांना धोका निर्माण झाला आहे . यामध्ये मोठे नुकसान झाले आहे. त्याबद्दल उद्धव ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन महेश सुर्वे यांना देण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com