कुपेकर भाजप

कुपेकर भाजप

89126
कोल्हापूर : मुंबईत झालेल्या कार्यक्रमात भाजपमध्ये संग्रामसिंह कुपेकर यांचे स्वागत करताना देवेंद्र फडणवीस. शेजारी डावीकडून बाळासाहेब कुपेकर, भय्यासाहेब कुपेकर, शिवाजी पाटील व इतर.

संग्रामसिंह कुपेकर भाजपमध्ये
मुंबईत पक्ष प्रवेश; फडणवीस यांची उपस्थिती
कोल्हापूर, ता. १४ : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष व शिवसेना ठाकरे गटाचे गेल्या विधानसभा निवडणुकीतील उमेदवार संग्रामसिंह कुपेकर यांनी आज मुंबईत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजप नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.
या वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, जिल्हा अध्यक्ष समरजित घाटगे, शिवाजीराव पाटील आदी उपस्थित होते.
विधानसभेचे माजी अध्यक्ष कै. बाबासाहेब कुपेकर व माजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांचे संग्रामसिंह हे पुतणे आहेत. २०१९ ची विधानसभा निवडणूक त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून लढवली होती. आज त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत भय्यासाहेब कुपेकर, बाळासाहेब कुपेकर, संतोष मळवीकर, दिगंबर देसाई, बबनराव देसाई, आनंदराव देसाई, बंडोपंत राणे, तानाजीराव पाटील, शेखर गावडे, डॉ. अनिल पाटील, प्रमोद कांबळे आदी कार्यकर्त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com