पाणीपुरवठा नियोजन

पाणीपुरवठा नियोजन

पाणी वितरणात दुर्लक्ष झाल्यास कारवाई
प्रशासक डॉ. कादंबरी बलवकडे यांचे आदेश; पाणीपुरवठा विभागाची बैठक

कोल्हापूर, ता.१४ : शहरातील पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी व्हॉल्व्ह वेळेवर सोडण्याचे नियोजन करा, गळती शोधून ती त्वरित दुरुस्त करा, पाणी वितरणाच्या दैनंदिन कामात दुर्लक्ष झाल्यास शाखा अभियंता, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना प्रशासक डॉ. कादंबरी बलवकडे यांनी दिल्या.
शहरातील काही भागांत अनियमित पाणीपुरवठा होत आहे. नागरिकांचा रोष वाढत असल्याने आयुक्त कार्यालयात पाणीपुरवठा विभागाकडील शाखा अभियंता, उपजल अभियंता, जल अभियंत्यांची बैठक झाली. त्यामध्ये प्रशासकांनी सूचना केल्या.
डॉ. बलवकडे म्हणाल्या, ‘सर्व शाखा अभियंत्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील चावीवाल्यांना दिलेल्या जबाबदाऱ्या ते व्यवस्थित पार पाडतात की नाही, याची खात्री करावी. यासाठी शाखा अभियंत्यांनी भागामध्ये स्वतः जाऊन खात्री करून उपजल अभियंत्यांना माहिती द्यावी. दैनंदिन कामामध्ये शाखा अभियंता किंवा संबंधित कर्मचाऱ्यांकडून वितरणामध्ये दुर्लक्ष झाल्यास त्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करावी. शिंगणापूरकडून आपटेनगरकडे होणारा अशुद्ध पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी योग्य उपाययोजना करा. जल शुद्धीकरण केंद्रावरील फिल्टर बेडमधील गाळाची स्वच्छता करा. शाखा अभियंत्यांनी भागात फिरती गळती असल्यास ती शोधून त्वरीत दुरुस्त करून घ्यावी. उपसा केंद्र, इतर वितरण वाहिन्यांवरील किरकोळ दुरुस्ती त्वरित करून घ्यावी.’
अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, जल अभियंता हर्षजित घाटगे, उपशहर अभियंता नारायण भोसले, उप जलअभियंता रावसाहेब चव्हाण, शाखा अभियंता अरुण गुजर, मिलिंद पाटील, मिलिंद जाधव, अभिलाषा दळवी, जयेश जाधव उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com