हॉटेल कामगार कल्याणकारी मंडळ निवेदन

हॉटेल कामगार कल्याणकारी मंडळ निवेदन

89145
कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देताना आमदार प्रकाश आबिटकर..

हॉटेल कामगार कल्याणकारी
मंडळाची स्थापना करावी
प्रकाश आबिटकर; मुख्यमंत्र्यांकडे मागणी
कोल्हापूर : राज्यातील हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगारांची संख्या मोठ्याप्रमाणात असल्यामुळे त्यांना कोणतीही शासकीय, निमशासकिय मदत मिळत नाही. सेवा (हॉटेल) क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या हजारो कामगारांच्या भविष्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र हॉटेल कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापन करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदार प्रकाश आबिटकर यांनी केली. मुंबई येथे सुरू असणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान लेखी निवेदनाद्वारे ही मागणी केली. निवेदनात म्हटले आहे, मुख्यमंत्री शिंदे यांनी सकारात्मक भूमिका घेत या दुर्लक्षित असलेल्या घटकाला न्याय देण्याबाबत शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले. याकरिता राज्यातील हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी महाराष्ट्र हॉटेल कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापन करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com