
अधिकारी खुर्च्चीत, कर्मचारी मोर्चात
अधिकारी खुर्चीत, कर्मचारी मोर्चात
जिल्हाधिकारी, प्रांत, तहसिल कार्यालयातील स्थिती
कोल्हापूर, ता. १४ : जुनी पेन्शन लागू करावी, या मागणीसाठी पुकारलेल्या बंदमुळे जिल्हाधिकारी, प्रांत, तहसिलदार, सर्कल, तलाठी कार्यालयातील कर्मचारी मोर्चात आणि अधिकारी खुर्चीत असे चित्र होते. तब्बल ९१० कर्मचाऱ्यांनी बंदमध्ये सहभाग घेतल्यामुळे शासकीय कामकाज कोलमडून पडले.
जिल्हाधिकारी कार्यालयात वरिष्ठांव्यतिरिक्त इतर सर्व खुर्च्या रिकाम्या होत्या. जिल्हाधिकाऱ्यांनी येणाऱ्या अभ्यागतांसह इतर शासकीय कामे उरकून घेण्यावर भर दिला. एकूणच त्यांच्या कामावर कोणताही परिणाम दिसून आला नाही. मात्र प्रांत, तहसिल, सर्कल, तलाठी कार्यालयातील सर्व कर्मचारी संपात असल्यामुळे लोकांची गैरसोय झाली. महसूलमध्ये एकूण ११८६ यापैकी २२ रजेवर आहेत. १५९ कार्यालयीन कामासाठी उपस्थित तर ९१० कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतला.