चंदगड मतदारसंघात ‘कमळा’ची मशागत

चंदगड मतदारसंघात ‘कमळा’ची मशागत

89328
संग्राम कुपेकर, शिवाजी पाटील

चंदगड मतदारसंघात ‘कमळा’ची मशागत
विधानसभा निवडणूक; कुपेकरांच्या प्रवेशाने भाजपची ‘बेरीज’
अजित माद्याळे : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १५ : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपकडून कमळ फुलविण्याची मशागत सुरु झाली आहे. चंदगड मतदारसंघात त्यांची मशागत यशस्वी झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते स्व. बाबा कुपेकर यांचे पुतणे तथा शिवसेनेचे संघटक संग्राम कुपेकर यांच्या प्रवेशाने भाजपने बेरीज साधली असली तरी उमेदवारीच्या शर्यतीत कुपेकर कुठंपर्यंत बाजी मारतात, याकडे राजकीय जाणकारांचे डोळे लागले आहेत.
विधानसभेच्या २०१४ मधील निवडणुकीत राष्ट्रवादीतून बंडखोरी करून संग्राम यांनी जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारीवर २५ हजार ८८४ मते मिळविली. त्यानंतर काही वर्षांनी त्यांनी हाती शिवबंधन बांधले. २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीद्वारे रिंगणात उतरुन ३३ हजार २७५ मते घेतली. याचवेळी शिवाजीराव पाटील भाजपच्या उमेदवारीसाठी धडपडत होते. परंतु कुपेकरांच्या उमेदवारीमुळे पाटील यांनी अपक्ष लढून दुसऱ्या क्रमांकाची ५१ हजार १७३ मते मिळविली. यामुळे आगामी निवडणुकीत भाजपच्या उमेदवारीवर पाटील यांचा दावा राहणार याचे संकेत मिळत असतानाच अचानक संग्राम यांना पक्षात घेवून भाजपने उमेदवारीसाठी शर्यत लावल्याचेही चित्र आहे. दुसरीकडे, पाटील यांनी मात्र मतदारसंघात वेगवेगळ्या कार्यक्रमाद्वारे अगामी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. यामुळे आता पाटील व कुपेकरांच्या उमेदवारीचे तलवार एकाच म्यानात कशा बसतील, याची चर्चा रंगत आहे.
अलीकडे कुपेकर शिवसेनेत समाधानी नव्हते. म्हणून ‘गोकुळ’मध्ये त्यांनी महाडिकांना साथ दिली तर केडीसीमध्ये हसन मुश्रीफ यांच्याशी जवळीकता साधली. शिवसेनेपासून पूर्णत: दुरावलेले कुपेकर काही काळ शांत राहणे पसंद करुन अचानक भाजपच्या गोटात सामील झाले. कुपेकरांच्या या भाजप प्रवेशामागे प्रामुख्याने खासदार धनंजय महाडिक यांचे प्रयत्न कारणीभूत असल्याचे बोलले जाते. अलीकडे राष्ट्रवादीचे आमदार राजेश पाटील व माजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्यातील दुरावा अधिकच वाढला आहे. भविष्यात हे चित्र असेच राहिल्यास राष्ट्रवादीतील मतांच्या विभागणीचा लाभ मिळवण्याचा प्रयत्न भाजप निश्‍चित करेल. त्यासाठी आगामी निवडणूक रणागणांत संग्राम यांची ढाल भाजपला कितपत पुढे नेते, हे पहावे लागेल.
--------------
चौकट...
कोण भारी ठरणार?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी शिवाजीराव पाटील यांची जवळीकता पाहता आगामी निवडणुकीत भाजपची उमेदवारी मिळवण्यात पाटील, तर संग्राम यांच्यामागे असलेली खासदार महाडिकांचे बळ आणि महाडिकांना भाजपमध्ये आलेले महत्व विचारात घेता ते सुद्धा उमेदवारीच्या शर्यतीत राहणार यात शंका नाही. यामध्ये कोण भारी ठरणार, याची उत्सुकता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com