आम आदमी पार्टीतर्फे मदत

आम आदमी पार्टीतर्फे मदत

टाकी पासिंग बीटी फॉर्म
शुल्क रद्दवर शिक्कामोर्तब

‘आप’ रिक्षाचालक संघटनेचा जल्लोष

कोल्हापूर, ता. १५ : एखाद्या रिक्षाचे इंजिन, चासीस किंवा टाकी बदलली असल्यास प्रादेशिक परिवहन कार्यालयात बीटी फॉर्म भरून घेतला जाण्याची तरतूद आहे; परंतु प्रत्येक टाकीच्या पासिंगवेळी हा नियम लागू करून साडेसातशे रुपये भरून घेतले जात असल्याचे आम आदमी रिक्षाचालक संघटनेने परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले होते.
यानुसार प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहन काटकर यांच्या उपस्थितीत आरटीओ येथील बैठकीत आम आदमी रिक्षाचालक संघटनेचे मार्गदर्शक संदीप देसाई यांनी अनावश्यक बीटी फॉर्म रद्द करण्याची कार्यवाही कधीपर्यंत करणार अशी विचारणा केली होती. यावर पाटील यांनी एका आठवड्यात याबाबत अंमलबजावणी केली जाईल, असे आश्वासन शिष्टमंडळास दिले. पाटील यांनी परिवहन विभागाकडून मार्गदर्शन मागवले होते. यावर सहपरिवहन आयुक्त जितेंद्र पाटील यांनी जुने सिलिंडर बदलून नवीन सिलिंडर बसवल्यास बीटी लागू होईल, अन्यथा होणार नाही, असे मत प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना कळवल्याने जाचक बीटी शुल्क रद्दवर अखेर शिक्कामोर्तब झाले.
हा निर्णय समजताच ‘आप’ रिक्षाचालक संघटनेतर्फे रिक्षाचालकांना साखर वाटप करून जल्लोष करण्यात आला. संघटनेचे जिल्हाध्यक्ष राकेश गायकवाड, बाबुराव बाजारी, मंगेश मोहिते, संजय नलावडे, प्रकाश हरणे, विजय भोसले, शकील मोमीन, प्रभाकर चौगुले, अमरसिंह दळवी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com