पाण्यासाठी रास्ता रोको

पाण्यासाठी रास्ता रोको

89500
अपुरा पाणीपुरवठा; नागरिकांचा रास्ता रोको
कोल्हापूर, ता. १६ ः गेल्या काही दिवसांपासून अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने यादवनगरमधील नागरिकांनी गुरुवारी सकाळी रास्ता रोको केला. त्यानंतर जलवाहिनी बदलण्याची कार्यवाही करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले.
अनेक दिवसांपासून कमी दाबाने तसेच अस्वच्छ पाणी येत आहे. त्यासाठी वारंवार तक्रार केल्यानंतर पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती. पण, समस्या सुटलेली नव्हती. चार दिवसांपासून पाणीच आले नाही. त्यामुळे वैतागून भागातील नागरिकांनी सकाळी रास्ता रोको केला. सकाळी वर्दळीच्या वेळी झालेल्या आंदोलनामुळे वाहतूक खोळंबली. उपजल अभियंता रावसाहेब चव्हाण व शाखा अभियंत्यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. परिसरात पाहणी करून कार्यवाही करू, असे त्यांनी सांगितले. पण, माजी नगरसेवक शिवाजी डवरी यांनी येथील जलवाहिनी जुनी असून, ती ठिकठिकाणी खराब झाली आहे. त्यातून खराब पाणी येत आहे. मुख्य जलवाहिनी बदलून द्यावी. अमृत योजनेतून नवीन पाईप टाकलेली नाही असे सांगितले. अभियंता चव्हाण यांनी अमृतमध्ये तरतूद असल्यात त्यातून अन्यथा अन्य तरतुदीतून जलवाहिनी बदलण्याचा प्रस्ताव तयार केला जाईल, असे सांगितले. त्यानंतर आंदोलन मागे घेतले. आंदोलनात शिवाजी डवरी, नियाज खान, बाबासाहेब डवरी, सदाशिव शारबिद्रे, अजित माजगावकर, नंदा सोनटक्के, राधा सोनटक्के, शर्मिला हळदीकर, गौतमी हळदीकर, नंदा पाटील, संगीता सोनटक्के आदी सहभागी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com