धान्यादी मालाचा आठवडाभरात पुरवठा

धान्यादी मालाचा आठवडाभरात पुरवठा

लोगो ः सकाळ बातमीचा परीणाम
--------
धान्यादी मालाचा
आठवडाभरात पुरवठा
शालेय पोषण आहार; मूगडाळ, हरभरा मेनू झाले निश्चित
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १७ : धान्यादी मालाचा पुरवठाच नसल्याने उसनवारीवर शालेय पोषण आहार शिजवला जात होता. काही शाळात पोषण आहार देणेच बंद केले होते. ''सकाळ''ने या प्रश्नाकडे लक्ष वेधत वृत्त प्रसिद्ध केले होते. दरम्यान, दोन महिन्यांसाठी मूगडाळ व हरभरा हे मेनू निश्चित झाले असून आठवडाभरात धान्यादी मालाचा शाळांना पुरवठा होईल, असे सांगण्यात आले.
शासनाच्या प्राथमिक शाळा व अनुदानित माध्यमिक शाळांतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जातो. पण, या शैक्षणिक वर्षात तीनदा धान्यादी मालाचा पुरवठा खंडित झाला. दीड महिन्यापासून पुरवठाच ठप्प असल्याने शालेय पोषण आहार उसनवारीतून शिजवण्याची वेळ ठेकेदारांवर आली होती. काही शाळांमध्ये पोषण आहार देणेच बंद झाले होते. धान्यादी मालाचा मेनू निश्चित केला नसल्याने दरकरारास विलंब झाल्याचे वास्तव होते. ‘सकाळ’ने या प्रश्नाकडे लक्ष वेधत ‘शालेय पोषण आहाराचा खेळखंडोबा’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते.
दरम्यान, शिक्षण विभागाने मूगडाळ व हरभरा हे मेनू निश्चित करुन दरकरार पूर्ण केला आहे. त्यामुळे धान्यादी मालाचा पुरवठा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शाळांनी आपापल्या मागण्या नोंदवल्या आहेत. त्यामुळे येत्या आठवडाभरात पुरवठादाराकडून धान्यादी मालाचा पुरवठा होण्याची शक्यता आहे. मार्च व एप्रिल अशा दोन महिन्यासाठी हा पुरवठा होणार आहे.
----------------
* तेलही मिळणार...
पुरवठादाराकडून पूर्वी धान्यादी मालातून तेलही दिले जात होते. पण, सहा-सात महिने तेलाचा पुरवठा बंद केला होता. पोषण आहार शिजवणाऱ्या ठेकेदारालाच तेलाची रक्कम दिली जात होती. मात्र, या वेळी धान्यादी मालातून तेलाचाही पुरवठा केला जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com