ठेकेदार कंपन्यांना पालिकेची नोटीस

ठेकेदार कंपन्यांना पालिकेची नोटीस

89764
कोल्हापूर ः टिपरचालकांना चालक पुरवणाऱ्या ठेकेदारांना काढलेली नोटीस महापालिकेने अन्याय निवारण समितीला दिली.

दोन ठेकेदार कंपन्यांना पालिकेची नोटीस
कंत्राटी चालकांसाठी नवीन निविदा; अन्याय निवारण समिती बैठक
कोल्हापूर, ता. १७ : महानगरपालिकेच्या घंटागाडीवर कंत्राटी चालक पुरविणारे ठेकेदार डी. एम. एंटरप्रायजेस व शिवकृपा सर्व्हिसेसना चालकांना किमान वेतन, अपघात विमा, भविष्य निर्वाह निधी देत असल्याचे पुरावे सात दिवसात सादर करण्याच्या नोटीस आज महापालिका प्रशासनाने दिल्या. तसेच चालकांसाठीची सध्याची निविदा रद्द करून नवीन निविदा राबवण्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहितीही महापालिकेतर्फे देण्यात आली.
कोल्हापूर शहर सर्वपक्षीय असंघटित कामगार अन्याय निवारण समितीची उपायुक्त रविकांत आडसूळ, आरोग्य अधिकारी, कामगार अधिकारी, मुख्य आरोग्य निरीक्षकांसमवेत बैठक झाली. त्यात कंत्राटी कामगार कायदा, किमान वेतन कायदा, वर्क ऑर्डर, महापालिकेची कर्तव्य यावर चर्चा झाली. यावेळी अधिकाऱ्यांनी काही नियम महापालिकेकडून राबविले गेले नसल्याचे मान्य केले व त्वरित दुरुस्ती करण्यात येईल असे सांगितले. किमान वेतन कायद्याप्रमाणे पगार, भविष्य निर्वाह निधी, अपघात विमा याची पूर्तता ठेकेदारांकडून करून घेतली जाईल, त्याचे पुरावेही घेतले जातील, असेही सांगितले. त्यानंतर उपायुक्त आडसूळ यांनी दोन्ही ठेकेदारांना लागू केलेल्या नोटीस समितीला दिला.
समितीचे आर. के. पोवार, अॅड. बाबा इंदूलकर, बाबा पार्टे, दिलीप देसाई, अशोक भंडारे, अॅड. सतिश नलवडे, अमर निंबाळकर, चंद्रकांत पाटील, अनिल घोडके, राजमाता जिजाऊ संघटनेच्या सुनिता पाटील, सुवर्णा मिठारी, रेश्मा पोवार, विद्या पोवार उपस्थित होते.
-----------
चौकट
बंद टिपरबाबतही नोटीस
समितीने वर्कशॉपमध्ये मोठे टिपर बंद स्थितीत असल्याचे छायाचित्र दाखविले. त्यावेळी संबंधित कर्मचाऱ्याला त्वरित नोटीस काढण्यात येऊन कारवाई केली जाईल, असे उपायुक्त आडसूळ यांनी सांगितले. तसेच १५ दिवसांनी पुन्हा बैठक आयोजित केली जाईल, असेही आश्‍वासन दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com