केएमटी पत्रक

केएमटी पत्रक

जुन्या बस बंदनंतर
कामाचे नियोजन करा
म्युनिसिपल ट्रान्स्पोर्ट वर्कर्स युनियनचे निवेदन
कोल्हापूर, ता. १७ ः शासनाच्या आदेशाप्रमाणे जुन्या बस बंद होणार असल्याने रोजंदारी कर्मचाऱ्यांना ड्यूटी मिळणार नाही. त्यांना काम उपलब्ध करण्यासाठी नियोजन करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे म्युनिसिपल ट्रान्स्पोर्ट वर्कर्स युनियनने अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक टीना गवळी यांच्याकडे आज केली.
‘सकाळ’ने आज एक एप्रिलपासून ४६ बस बंद होणार असल्याची बातमी प्रसिद्ध केली आहे. त्याची केएमटीमध्ये जोरदार चर्चा झाली असून केएमटी कर्मचारी युनियनने गांभीर्याने घेऊन प्रशासनाला निवेदन दिले. त्यात म्हटले आहे, जुन्या बस बंद होणार असल्याने काही कायम कर्मचाऱ्यांना ड्यूटीसाठी हजेरीमध्ये काम करावे लागणार आहे. रोजंदारी कर्मचाऱ्यांनाही काम मिळणार नाही. यामुळे त्यांना काम मिळावे व नादुरुस्त बसेस त्वरित दुरुस्त करण्याचे नियोजन करावे. रोस्टर तपासून चार महिने होत आले. प्रस्ताव लवकरात लवकर पाठवावा. १ एप्रिल केएमटीचा वर्धापन दिन असल्याने राहिलेल्या महागाई पैकी २५ टक्के एप्रिलच्या पगारामध्ये समाविष्ट करावा. तसेच गुढीपाडवा सणासाठी कोरोना काळात पगारातून २५ टक्के कपात झालेली रक्कम पगाराबरोबर मिळावी. निवेदन देण्यासाठी अध्यक्ष प्रमोद पाटील, खजानिस राजू वडर, मनोज नार्वेकर, जयदीप शिंदे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com