देवस्थान समिती कर्मचारी बैठक

देवस्थान समिती कर्मचारी बैठक

89937
...

देवस्थान समितीच्या कर्मचाऱ्यांची बैठक

नूतन सचिव सुशांत बनसोडे यांनी दिल्या सूचना

कोल्हापूर, ता. १८ ः पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे नूतन सचिव सुशांत बनसोडे यांनी आजपासून देवस्थान समितीच्या प्रत्यक्ष कामकाजाला प्रारंभ केला. देवस्थान समितीच्या कर्मचाऱ्यांची बैठक घेवून त्यांनी प्रलंबित कामे तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. त्याशिवाय समितीच्या अखत्यारितीतील सर्व मंदिरांबाबतच्या नोंदी अद्ययावत करण्याबाबतही त्यांनी सूचना दिल्या. त्याशिवाय समितीच्या एकूणच कामाची माहितीही घेतली.
दुपारनंतर अंबाबाई मंदिर आणि परिसराची त्यांनी पाहणी केली. तेथील सध्या सुरू असलेली विविध कामे, आगामी काळातील प्रस्तावित कामे, भाविकांसाठीच्या सुविधा, सुरक्षा यंत्रणा आदी गोष्टींची माहिती त्यांनी जाणून घेतली. ते म्हणाले, ‘काल रात्रीच पदभार स्वीकारला असून त्यानंतर समितीचे प्रशासक तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी बैठक घेवून विविध सूचना दिल्या. येत्या काळात त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाईल.’
दरम्यान, समितीचे प्रशासक तथा जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी काल शिवराज नाईकवाडे यांच्याकडून तडकाफडकी पदभार काढून घेतला व श्री. बनसोडे यांच्याकडे या पदाची जबाबदारी दिली आहे.
.................
..............

‘वुई सपोर्ट’ शिवराज नाईकवाडे

सोशल मीडियावरून भाविकांची मोहिम

कोल्हापूर, ता. १८ ः पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे प्रशासक तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी काल शिवराज नाईकवाडे यांच्याकडून सचिवपदाचा पदभार तडकाफडकी काढून घेतला. त्यानंतर आता सोशल मीडियावरून ‘वुई सपोर्ट शिवराज नाईकवाडे’ ही मोहिम सुरू झाली असून जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी कोणतेच कारण न दिल्याने नाराजी व्यक्त होवू लागली आहे.
श्री. नाईकवडे यांनी सचिव म्हणून काम करताना मंदिराला मूळ स्वरूप आणण्याबरोबरच समितीच्या उत्पन्नवाढीसाठीही त्यांनी प्रयत्न केले. त्यांच्याकडून तडकाफडकी पदभार का काढून घेतला, असा या मोहिमेतील भाविकांचा संतप्त सवाल आहे. त्यासाठी प्रसंगी मोर्चाचीही तयारी सुरू झाली आहे. पालकमंत्री उद्या (रविवारी) मंदिरात येणार असून त्यावेळी याबाबत त्यांनाही विचारणा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, श्री. नाईकवाडे यांच्या कार्यकालात चांगली कामे सुरू होती. पण, त्यांच्याकडून पदभार काढून घेण्याचा निर्णय वेदना देणारा असून त्यांनी सुरू केलेली कामे प्रशासनाने तत्काळ पूर्ण करावीत, अशा मागणीचे पत्रक श्री अंबाबाई भक्त मंडळाच्या वतीने अध्यक्ष संजय साळोखे यांनी प्रसिध्दीस दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com