भाजप आनंदोत्सव बातमी

भाजप आनंदोत्सव बातमी

फोटो - 89989

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयास
मान्यता मिळाल्याने भाजपचा जल्लोष

बिंदू चौकात साखर-पेढे वाटून आनंदोत्सव

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १७ ः राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोल्हापूर जिल्ह्यात होणाऱ्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला मान्यता जाहीर केली. याचा आनंदोत्सव आज भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बिंदू चौकात साखर-पेढे वाटून साजरा केला.
यावेळी जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे म्हणाले, ‘आपल्या कामाची प्रसिद्धी न करता समाजोपयोगी कार्य करत राहणे हा मंत्री चंद्रकांत पाटील यांचा गुण आहे. जिल्ह्यात अनेक मंत्री होऊन गेले. केवळ मोठे बोलून आपलेच उद्योग मोठे करायचे, असा यापूर्वीच्या नेत्यांचा इतिहास आहे. कोल्हापुरात अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मान्यतेमुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. आपल्याच जिल्ह्यात दर्जेदार शिक्षण विद्यार्थांना मिळणार आहे. यासारखे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय सरकारच्या माध्यमातून घेतले जात आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी झालेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल भाजप कोल्हापूरच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील यांचे विशेष आभार मानत आहोत.’
प्रदेश कार्यकारिणी सदस्य महेश जाधव म्हणाले, ‘चंद्रकांत पाटील यांनी विविध समाजोपयोगी कामे केली. जनतेची गरज लक्षात घेऊन त्यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयाला मान्यता दिली, ही आनंदाची बाब आहे.’
संघटन सरचिटणीस अशोक देसाई, सरचिटणीस विजय जाधव, हेमंत आराध्ये, विजयसिंह खाडे-पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सरचिटणीस गणेश देसाई, राजू मोरे, अमोल पालोजी, सचिन तोडकर, विजय आगरवाल, अजित ठाणेकर, रवींद्र मुतगी, गिरीश साळोखे, आशिष कपडेकर, गायत्री राउत, संदीप कुंभार, विशाल शिराळकर, नरेंद पाटील, सचिन सुतार, प्रकाश घाटगे, प्रीतम यादव, सुनीता सूर्यवंशी, छाया ननावरे, प्रसाद पाटोळे, गौरव सातपुते, विवेक वोरा, सुनील पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
................

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com