शेंडूरच्या मैदानात बोंगार्डे विजयी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेंडूरच्या मैदानात बोंगार्डे विजयी
शेंडूरच्या मैदानात बोंगार्डे विजयी

शेंडूरच्या मैदानात बोंगार्डे विजयी

sakal_logo
By

2684
शेंडूर (ता. कागल) : येथील कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाची कुस्ती लावताना मान्यवर व उपस्थित कुस्तीशौकीन.
(छायाचित्र : पराग फोटो, सिद्धनेर्ली)

शेंडूरच्या मैदानात बोंगार्डे विजयी
---
शेटे चितपट; गहिनीनाथ गैबी पीर उरसानिमित्त कुस्त्यांचे आयोजन
सिद्धनेर्ली, ता. १९ : शेंडूर (ता. कागल) येथील कुस्ती मैदानात बानगेच्या अरुण बोंगार्डेने इचलकरंजीच्या विक्रम शेटेला स्वारी डावावर चितपट केले. गहिनीनाथ गैबी पीर उरसानिमित्त ग्रामपंचायतीतर्फे सलग दहाव्या वर्षी कुस्ती मैदानाचे आयोजन केले होते. मैदानात लहान-मोठ्या १२५ हून अधिक कुस्त्या झाल्या. शौकिनांना बैठक व्यवस्थेसाठी गॕलरीसह नेटके नियोजन करण्यात आले.
१९ मिनिटे चाललेल्या लढतीत बोंगार्डेने एकतर्फी वर्चस्व राखत शेटेच्या मानेचा कस काढून पुरते घायाळ केले. त्यामुळे थकलेल्या शेटेने बरोबरीत कुस्ती सोडविण्याची केलेली विनंती पंचांनी नाकारली. शेवटी थकलेल्या शेटेला बोंगार्डेने चितपट केले.
दुसऱ्या क्रमांकासाठीच्या दोन लढतींमध्ये मुरगूडच्या रोहन रंडेने शाहूपुरीच्या लिंगराज होनमानेवर घिस्सा डावावर मात केली; तर राष्ट्रकुलच्या सुनील खताळने बानगेच्या शशिकांत बोंगार्डेवर मात केली. तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत बानगेच्या अतुल डावरेने शाहूपुरीच्या सौरभ केकानला केवळ दुसऱ्या मिनिटाला गदेलोट डावावर अस्मान दाखविले.
इतर प्रमुख विजयी मल्ल असे ः ऋषीकेश काळे, सचिन बाबर, शुभम कोळेकर, विक्रम गावडे, ओंकार लाड, संतोष हिरुगडे, प्रवीण वडगावकर, जय भांडवले, विघ्नेश शेवाळे, किरण चव्हाण. प्रथम क्रमांकाचा विजेता अरुण बोंगार्डे याला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, बाळासाहेब तुरंबे, विश्‍वास दिंडोर्ले, सरपंच अमर कांबळे, उपसरपंच अजित डोंगळे, गुणाजीराव निंबाळकर आदींच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. या वेळी ‘गोकुळ’चे संचालक अंबरिषसिंह घाटगे, सचिन माने, अनिल मोरे, निखिल निंबाळकर, राजू मुजावर, मधुकर भांडवले, बाबूराव मगदूम आदी उपस्थित होते.
नामदेव बल्लाळ, बाळासाहेब मेटकर, के. बी. चौगुले, रवींद्र पाटील, सर्जेराव पाटील, भैरवनाथ आरेकर, मनोहर शेवाळे आदींनी पंच म्हणून काम पाहिले. राजाराम चौगुले व अवघडी शेळके यांनी बहारदार निवेदन केले.
----------------
चौकट...
चंदगडी मल्लावर कौतुक आणि पैशांचा पाऊस
चंदगडच्या विक्रम गावडेने ‘कुंभी’च्या आदिनाथ फिरंगेला नमविताना चटकदार कुस्ती केली. त्यामुळे या चंदगडी मल्लावर कुस्ती शौकिनांनी कौतुकाबरोबरच पैशांचाही वर्षाव केला.