हेडगेवार व्याख्यानमाला गुरुवार पासून

हेडगेवार व्याख्यानमाला गुरुवार पासून

डॉ. हेडगेवार व्याख्यानमाला उद्यापासून

कोल्हापूर, ता.२१ ः हिंदू व्यासपीठतर्फे आयोजित डॉ. के. ब. हेडगेवार व्याख्यानमालेला गुरुवार (ता.२३) पासून प्रारंभ होणार आहे. ही व्याख्यानमाला शनिवार (ता.२५) पर्यंत असून दसरा चौकातील शाहू स्मारक भवन येथे दररोज सायंकाळी ६ वाजता व्याख्याने होतील. यावर्षी व्याख्यानमालेत आमदार नितेश राणे, डॉ. उदय निरगुडकर आणि शिरिष महाराज मोरे व्याख्यान देणार आहेत.
राष्ट्रीय विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे नेते दिवंगत सुभाष वोरा यांनी हिंदू व्यासपीठची स्थापना केली. या हिंदू व्यासपीठच्या वतीने दरवर्षी गुढी पाडव्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. के. ब.हेडगेवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते. व्याख्यानमालेत गुरुवारी (ता.२३) जगदगुरू संत तुकाराम महाराज यांचे ११ वे वंशज शिरिष महाराज मोरे हे ‘छत्रपती शिवराय हिंदू दर्शन’ या विषयावर बोलतील. शुक्रवारी (ता.२४) आमदार नितेश राणे हे ‘लव्ह जिहाद, धर्मांतर विरोधी कायदा का?’ या विषयावर भूमिका मांडतील. शनिवारी (ता.२५) डॉ. उदय निरगुडकर हे विचार मांडणार आहेत. ‘हिंडेनबर्ग, अदानी आणि बरेच काही’ या विषयावर पत्रकार सुशील कुलकर्णी हे डॉ. निरगुडकर यांची प्रकट मुलाखत घेतील. या व्याख्यानमालेला नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com