जाहिरात बातमी

जाहिरात बातमी

खास गुढीपाडव्यानिमित्त
‘टाटा तनिष्क’ची नवी ऑफर
कोल्हापूर, ता. २१ : टाटा तनिष्क ज्वेलर्सतर्फे खास गुढीपाडव्याच्या खरेदीवर खास ऑफर जाहीर करण्यात आली आहे. पाडव्याच्या प्रत्येक खरेदीसोबत सोन्याचे नाणे मिळणार आहे. गुढीपाडवा आणि लग्नसराईनिमित्त दागिन्यांची खास रेंजही टाटा तनिष्कने ग्राहकांसाठी आणली आहे. मनमोहक व आकर्षक कलाकुसरीसह टाटा तनिष्कच्या दागिन्यांची म्हणजे शुद्धतेची खात्री आणि परत बदली करून घेताना तूट-घट धरली जात नाही. या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन टाटा तनिष्क कोल्हापूरचे प्रसाद कामत यांनी केले आहे.
अप्रतिम कलाकुसर, शुद्धतेची खात्री, प्रत्‍येक दागिन्याचे हॉलमार्किंग, प्रत्येक खरेदीसोबत मिळणारे दागिन्यांचे प्रमाणपत्र याबरोबरच २२ कॅरेट शुद्ध सोन्याच्या दागिन्यांना २२ कॅरेटचाच दर येथे आकारला जातो. २२ कॅरेटच्या दागिन्यांमध्ये फिलिग्री वर्क, फ्यूजन वर्क, मीना वर्क, जडाऊ वर्क, ग्लास कुंदनचे दागिने यांचे असंख्य नमुने येथे पाहावयास मिळतात. खास लग्नसराईनिमित्त टाटा तनिष्कने असंख्य असे २२ कॅरेटचे व १८ कॅरेटमध्ये हिरेजडीत मंगळसूत्र आणले आहेत. २२ कॅरेटमध्ये १८ इंचांपासून ३४ इंचांपर्यंतचे असंख्य मंगळसूत्र टाटा तनिष्कमध्ये पाहावयास मिळणार आहेत. तसेच हिरेजडीत मंगळसूत्र ४० हजारांपासून सुरू होतात. या हिरेजडीत मंगळसुत्रात हिरा बसविण्यापूर्वी तपासला जातो. त्यामुळे खात्रीशीर हिऱ्यांची खरेदी केली जाते. लग्नसराईच्या खरेदीसाठी टाटा तनिष्कमध्ये विविध मंगळसुत्रांपासून विविध प्रकारच्या बँगल्स, नेकलेस, नेकलेस सेट, कानातील दागिने, अंगठ्या ‍यांचे असंख्य नमुने पाहावयास मिळतील. आपल्या जुन्या सोन्याच्या बदलीत नवीन टाटा तनिष्कचे दागिने ग्राहक घेऊ शकतात. जुन्या सोन्याच्या मूल्यांकनानुसार त्याला योग्य भाव दिला जातो. टाटा तनिष्ककडून गुढीपाडव्याच्या खरेदीवर ऑफरचा लाभ घ्यावा. ही ऑफर बुधवार (ता. २२) पर्यंत राहील, असेही प्रसाद कामत यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com