गड-जिल्हास्तरीय योग स्पर्धा

गड-जिल्हास्तरीय योग स्पर्धा

फोटो क्रमांक : 90520
गडहिंग्लज : श्रद्धा हॉस्पिटल व योग कल्चर असोसिएशनतर्फे झालेल्या योग स्पर्धेच्या बक्षीस वितरणप्रसंगी ज्योत्स्ना पताडे, डॉ. रवींद्र पाटील, डॉ. माधुरी पाटील आदी.
..............

गडहिंग्लजला जिल्हास्तरीय
योग स्पर्धा उत्साहात

विविध वयोगटांतील १०० स्पर्धकांचा सहभाग

गडहिंग्लज, ता.२२ : येथील प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभागृहात जिल्हास्तरीय योग स्पर्धा झाली. नेसरीतील श्रद्धा हॉस्पिटल, योग व गर्भसंस्कार केंद्र आणि योग कल्चर असोसिएशनतर्फे (कोल्हापूर) जिल्हास्तरीय योग स्पर्धा झाली. विविध वयोगटांत झालेल्या स्पर्धेत १०० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. ट्रॅडिशनल, ऱ्हिदमिक व आर्टिस्टिक प्रकारात स्पर्धा झाली.
गटनिहाय अनुक्रमे विजेते असे - (६ ते १० वयोगट मुले)- आर्यन जाधव, श्रीवर्धन डेळेकर, वेद देसाई. (मुली)- स्वरा गोडसे, मृण्मयी करंदीकर, श्रेया लोखंडे. (१० ते १५ वयोगट मुले) - सोहम गाडगीळ, निसर्ग मडिवाळ, यशवंत वैद्य. (मुली) - नव्या देवार्डे, इशिता पाटील, उमंग सैनी. (१५ ते २२ वयोगट मुले) - स्वराज कुंभार, रोहित बेडगे, सूरज महाडिक. (मुली)- मानसी पोटे, सिद्धी पोटे, श्रुती माळगी. (२२ ते ३० वयोगट मुले) - रोहित कुरुणकर, विशालराज पाटील. (मुली) - अक्षता भाईंगडे. (३० ते ४० वयोगट) - स्मिता धनके, प्रणोती पाटील, शालन पाटील. (४० ते ५० वयोगट पुरुष) - गोपालकृष्ण कालेकर, सचिन कांबळे, आर. डी. पाटील. (महिला) - सुलोचना मोहिते, माधुरी पाटील. (५० ते ६० वयोगट पुरुष) - संदीप कागवाडे. (महिला)- रोहिणी जमादार. (६५ वर्षांवरील) - सुशीला पाटील.
ज्योत्स्ना पताडे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्‍घाटन झाले. योगशिक्षक गुरुलिंग खंदारे, डॉ. रवींद्र पाटील, सौ. पताडे यांची भाषणे झाली. कविता गुरवे, डॉ. सुरेखा पाटोळे, डॉ. माधुरी पाटील, डॉ. अजित कारजगी, डॉ. संजय चौगुले, नागरत्ना नाईक, भारती डेळेकर, श्रेया आजरी, आप्पा शिवणे उपस्थित होते. जयश्री पाटील यांनी प्रास्ताविक केले. गीता मोरे व महेश घुगरे यांनी सूत्रसंचालन केले. दीप्ती पाटील यांनी आभार मानले.
.............................

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com