गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘शाळा प्रवेश’ उत्साहात

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘शाळा प्रवेश’ उत्साहात

90661


‘शाळा प्रवेश’

शालेय साहित्य देवून विद्यार्थ्यांचे स्वागत

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २२ ः गुढीपाडव्याला आज जिल्ह्यातील २० हजार ८९ चिमुकल्यांचा ‘शाळा प्रवेश’ झाला. त्यातील ९५ टक्के जणांचा त्यांच्या पालकांनी इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश निश्‍चित केला. या विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांना चॉकलेट, शालेय साहित्याच्या स्वरूपात भेटवस्तू देवून शाळांनी स्वागत केले.
महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने आज ‘गुढीपाडवा शाळा प्रवेश वाढवा’ मोहीम राबविली. याअंतर्गत महानगरपालिकेच्या श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिरात मंगळवारी रात्रीपासून पालकांची प्रवेशासाठी रांग लागली. टेंबलाईवाडी विद्यामंदिर, फुलेवाडी येथील महात्मा फुले विद्यालय, नेहरूनगर विद्यालयातही पालकांची गर्दी राहिली. ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेशोत्सव उत्साहात झाला. सायंकाळी सातपर्यंत शिक्षण विभागाकडे नोंद झालेल्या आकडेवारीनुसार दिवसभरात एकूण २० हजार ८९ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित झाले. त्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये २० हजार ८९, तर उर्वरित ९९१ इतकी प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या महानगरपालिकेच्या शाळांतील आहे.

कोट
महापालिकेच्या शाळांमध्ये स्पर्धात्मक विद्यार्थी घडविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. त्यामुळे या शाळांतील पटसंख्या वर्षागणिक वाढत आहे. सायंकाळी पाचपर्यंतच्या आकडेवारीनुसार या शाळांतील ६५ टक्के प्रवेश निश्‍चित झाले आहेत.
-एस. के. यादव, प्रशासनाधिकारी, प्राथमिक शिक्षण समिती
...
कोट
प्राथमिक शिक्षण विभागाने राबविलेल्या गुढीपाडवा प्रवेश वाढवा उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दाखलपात्र विद्यार्थ्यांपैकी ६४.४५ टक्के जणांचे प्रवेश निश्‍चित झाले आहेत.
-आशा उबाळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी
......
चार्ट करणे
तालुकानिहाय विद्यार्थी प्रवेशाची आकडेवारी
हातकणंगले-३३४१
करवीर-३१७१
शिरोळ-२०६८
कागल-१७६५
पन्हाळा-१६९०
चंदगड-१५३९
राधानगरी-१४७०
शाहूवाडी-११५९
गडहिंग्लज-९८९
भुदरगड-८७८
आजरा-६४७
गगनबावडा-३८१
...................................................
इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्येही गर्दी
शहर आणि जिल्ह्यातील स्टेट आणि सीबीएसई बोर्डाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश निश्‍चित करण्यासाठी पालकांनी गर्दी केली. बहुतांश पालक त्यांच्या पाल्यांना घेवून शाळेमध्ये आले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com