तर, महापूर, अवकाळी पाऊसाचा सामना करावा लागणार

तर, महापूर, अवकाळी पाऊसाचा सामना करावा लागणार

जागतिक हवामान दिन विशेष... लोगो
...


तर, महापूर, अवकाळीचा सामना

कोल्हापूरला बसणार फटका;प्रदूषण टाळण्यासाठी वेळीच पावले उचलणे गरजेचे

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. २२ ः वाढते प्रदूषण आणि पर्यावरणाच्या ऱ्हासाने हवामान बदल मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याचा कोल्हापूर जिल्ह्याला देखील फटका बसत आहे. येथील कमाल आणि किमान तापमानात वारंवार चढ-उतार दिसून येत आहे. प्रदूषण टाळण्यासाठी वेळीच पावले उचलले नाहीत, तर महापूर, अवकाळी पाऊस, भूस्खलन आदी नैसर्गिक आपत्तींचा कोल्हापूरकरांना सामना करावा लागणार आहे.
हवामान बदलाचा मोठ्या प्रमाणात परिणाम हा शेती, समुद्र किनारी प्रदेश व मानवी जीवनावर होत आहे. मुसळधार पाऊस, भूस्खलन,महापूर, वादळे, दुष्काळ या सारख्या समस्या निर्माण होत आहेत. कोल्हापूर जिल्ह्याचे हवामान बदलले आहे. महापूर, वर्षभर पाऊस, थंडी गायब होणे, जोरदार वारे, पहाटे धुक्याची चादर, अवकाळी पाऊस अशी स्थिती राहिली आहे. भात, ऊस, मका आणि शेतीमधील अन्य पिकांवर परिणाम झाला आहे. कोल्हापूरचे कमाल आणि किमान तापमानात चढ उतार होताना दिसत आहे. आता मार्चमध्ये येथील तापमान ३२.८ अंश सेल्सिअस, तर कमीत कमी तापमान १९.२ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले आहे. वृक्षसंवर्धन, पर्यावरण रक्षणाचे पाऊल गतीने टाकले नाही, तर आल्हाददायक वातावरण असलेल्या कोल्हापूरला विविध नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागणार आहे.
................


‘गेल्या तीन वर्षांत विविध चक्रीवादळे निर्माण झाली. त्यामुळे मुसळधार पाऊस, महापूर, दरड कोसळणे, विजा पडणे, गारपीट, थंडीची मोठी लाट आदी नैसगिक आपत्तींचा नागरिकांना सामना करावा लागला आहे. ध्रुवावरील बर्फ वितळल्यामुळे समुद्रीकिनारपट्टीवरील देशांना धोका निर्माण झाला आहे. हवामान बदलाचा कोल्हापूरही फटका बसत आहे. बदलत्या हवामानाचा दैनदिन जीवनावर परिणाम होत आहे. त्यामुळे पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने हातभार लावणे आवश्यक आहे.
- डॉ. युवराज मोटे, भूगोल व पर्यावरण अभ्यासक
......................

हवामान बदलाची जागृती करणे

दरवर्षी २३ मार्च हा दिवस जागतिक हवामान दिन म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघाच्या जागतिक हवामान विभागामार्फत १९६१ पासून जागतिक हवामान दिन साजरा केला जात आहे. हवामान बदलाची जागृती करणे, या बदलाची आकडेवारी संकलित करणे, पृथ्वीच्या हवामानाची माहिती सांगणे, या उद्देशाने जागतिक हवामान विभाग काम करत आहे, असे डॉ. मोटे यांनी सांगितले.
..........


पिकांवर अवेळी कीड, रोगांमध्ये वाढ

गेल्या दोन ते तीन वर्षात कोल्हापूरच्या हवामानात विविध बदल जाणवू लागले आहेत. त्याचा परिणाम म्हणून यापुढील काळात अवेळी मुसळधार पाऊस, ढगफुटी, अचानकपणे तापमानात चढ-उतार होणे, संसर्गजन्य रोगांमध्ये वाढ, पिकांवर अवेळी कीड पडणे यांना कोल्हापूरकरांना सामोरे जावे लागणार असल्याचे पर्यावरण अभ्यासक डॉ. विकास जाधव यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com