कुमार महाराष्ट्र केसरी कुस्त्यांचा थरार

कुमार महाराष्ट्र केसरी कुस्त्यांचा थरार

इचलकरंजीत उद्यापासून
कुमार महाराष्ट्र केसरी स्पर्धा
इचलकरंजी, ता.२३ : राज्य कुस्तीगीर परिषद व कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघाच्या मान्यतेने येथे प्रथमच कुमार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होत आहे. मॅटवर होणाऱ्‍या कुस्त्यांचा थरार कुस्ती शौकिनांसाठी मेजवानी ठरणार आहे. स्पर्धा शनिवार (ता. २५) व रविवार (ता. २६) सकाळी ८ ते १० व दुपारी ४ ते ७ अशा दोन सत्रात होणार असल्याची माहिती उपमहाराष्ट्रकेसरी अमृत भोसले यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, ‘‘कुमार महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी ४५ जिल्हयातील सुमारे ५०० पैलवान सहभागी होणार होणार आहेत. १७ वर्षा आतील होणाऱ्‍या स्पर्धेसाठी ४१, ४५, ४९, ५१, ५५, ६०, ६५, ७१, ८०, ९२ पुढे ११० किलोग्रॅम असे वजनी गट आहेत. ३५ पंचांना निमंत्रित केले आहे. या स्पर्धेतूनच उद्याचा ऑलिंम्पिकवीरही घडणार आहे. स्पर्धा व्यंकोबा मैदान व डायनॅमिक स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर होईल. स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, हिंदकेसरी दीनानाथसिंह, महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख, तालीम संघाचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील, सतीश डाळ्या, महावीर गाट, मदन कारंडे, संजय कांबळे, अशोक माने, किरण कोळी, बाबुराव दांडगे उपस्थित असतील. समारोपावेळी शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे, आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण होईल. रामदास कोळी, बाळू शिंदे, बजरंग अब्दागिरे, रवींद्र पाटील, बंडा उगळे, बाबूराव जाधव, रवींद्र लोहार, मोहन सादळे, बाळू शिंदे, अंकुश पसारे, भारत बोंगार्डे आदी संयोजन करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com