जाहिरात बातमी

जाहिरात बातमी

डी वाय पाटील अभियांत्रिकीमध्ये सोमवारपासून
‘एन्व्हार्मेंटल हेल्थ-सेफ्टी’ वर कार्यशाळा
कोल्हापूर : येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या केमिकल इंजिनिअरिंग विभागातर्फे प्राध्यापकांसाठी ‘रिसेंट ट्रेंड्स इन एनवोर्मेन्टल हेल्थ अँड सेफ्टी अस्पेक्ट्स इन इंडस्ट्रीज’ या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. सोमवार (ता. २७) ते गुरूवार (ता. ३१) या कालावधीत होणाऱ्या या कार्यशाळेत औद्योगिक, पर्यावरण, आरोग्य व सुरक्षा विषयाचे अभ्यासक आणि शासकीय तसेच विविध संस्थेतील पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. उद्‍घाटन राज्य शासनाच्या औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य विभागाचे सहसंचालक सुरेश जोशी यांच्या हस्ते होईल. ‘फॅक्टरी ॲक्ट १९४८’ संदर्भात धोरणे व अंमलबजावणी, नव्याने झालेले बदल याबद्दल ते मार्गदर्शन करतील. महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रमोद माने सांडपाणी पुनर्वापर या विषयावर विचार मांडतील. एशियन इन्स्टिट्यूट ऑफ फायर अँड सेफ्टी, पनवेलचे संचालक जयेश पाटील, एन.आर.जी. काँझ इंजिनीअर्स ग्रुपचे संस्थापक परिमल देशपांडे, ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ विकास जाधव हेही मार्गदर्शन करतील. याचा लाङ घ्यावा, असे आवाहन कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी केले आहे. केमिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. के. टी. जाधव यांनी या संयोजन केले असून प्रा. डॉ. राहुल महाजन समन्वयक आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com