दाजीपूर-राधानगरी वाहतूक

दाजीपूर-राधानगरी वाहतूक

दाजीपूर-राधानगरी रस्ता दोन महिने बंद
जिल्हाधिकारी रेखावार ःदुरूस्तीचे काम, वाहतूक पर्यायी मार्गाने

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २३ : देवगड-निपाणी-कलादगी रस्ता हायब्रीड ॲन्युटी या योजनेअंतर्गत रस्त्याचे रुंदीकरण, डांबरीकरण, काँक्रीटीकरण, मोऱ्या व लहान पुलांच्या पुनर्बांधणी केली जाणार आहे. हे काम १ एप्रिल ते ३१ मे दरम्यान केले जाणार असल्याने हा रस्ता दोन महिने बंद राहणार आहे. त्यामुळे दाजीपूर ते राधानगरी रस्त्यावरील सर्व प्रकारची वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू ठेवली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, दाजीपूर ते राधानगरी दरम्यानच्या रस्त्यावर नागरिकांच्या व वाहन चालकांच्या माहितीसाठी योग्य ठिकाणी दिशाचिन्हे व माहिती फलक लावावेत, यासाठी पोलिस अधीक्षक, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम (दक्षिण) विभाग, कोल्हापूर व उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे नियोजन करावे. दरम्यान, देवगड-कलादगी रस्त्याचे काम वेगाने करून वाहतूकदारांची गैरसोय टाळावी. हा रस्ता दाजीपूर ते राधानगरी रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंद करुन वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात येणार आहे. हलक्या व लहान वाहनाकरीता बालिंगा-महेपाटी कोते-धामोड-शिरगाव-तारळे पडळी-कारीवडे-दाजीपूर-ओलवण मार्गाचा वापर करावा. मुदाळतिट्टा मार्गे येणारी हलकी व लहान वाहने सरवडे-सोळांकूर-राधानगरी- राधानगरी महाविद्यालय-पिरळ पूल-मार्गावरुन व कोकणातील वाहने फोंडा घाट-दाजीपूर-कारीवडे-पडळी-पिरळ पूल-राधानगरी या मार्गाने वळवली जातील. अवजड व मोठी वाहतूक रस्त्यावरुन पूर्णपणे बंद करुन कोकणातून कोल्हापूरकडे येणारी अवजड वाहने फोंडा-कणकवली फाटा-नांदगाव-तरेळे वैभववाडी-गगनबावडा मार्गे कोल्हापूर अशी वळविण्यात येत आहेत. कर्नाटकातून येणारी अवजड वाहने कोकणामध्ये जाण्याकरीता मुदाळतिट्टा- आजरा-आंबोली-सावंतवाडी अशी वळविण्यात येत आहेत.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com