आजरा ः गव्यांच्या कळपा कडून नुकसान

आजरा ः गव्यांच्या कळपा कडून नुकसान

ajr245.jpg 91151
हाजगोळी बुद्रक (ता. आजरा) ः येथे गव्याच्या कळपाकडून फस्त केलेले ऊसाचे पीक.

हाजगोळी पंचक्रोशीत गव्यांचा धुमाकूळ
शेतकरी चिंताग्रस्त; बंदोबस्त करण्याची मागणी

भादवण, ता. २४ ः हाजगोळी बुद्रक, पेद्रेवाडी, दाभेवाडी व कोवाडे या परिसरातील शेतीमध्ये गव्यांच्या कळपाने धुमाकूळ घातला आहे. ऊसाची लावण, खोडवा व मका कळप फस्त करीत आहे. शेतकरी चिंताग्रस्त झाले असून, कळपाचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
चाळोबाची बारी या जंगल, काळमादेवीचा डोंगर, झरवान भावचा परिसरात गव्यांची राहूटी आहे. सांयकाळ होताच गवे कळपाने शेतीमध्ये उतरत आहेत. शेतातील ऊसाची तरारून आलेली लावण, खोडवा व मका ते फस्त करीत आहेत. त्यानंतर ते पाणी पिण्यासाठी नजीकच्या पाणवठ्यावर जातात. त्यांचा हा नेहमीचा शिरस्ता झाला आहे. शेतकऱ्यांनी गव्यांना हाकलण्यासाठी विविध उपाय योजना केल्या आहेत. पण, तरीही गवे बधेनासे झाले आहेत. रात्री अपरात्री रस्त्यावरून ये- जा करणे अवघड झाले आहे. मार्निंग वॉकला जाणाऱ्यांना गव्याचे हमखास दर्शन होते. नागोजी होरटे, परशराम होडगे, धोंडीबा हुंदळेकर, पुंडलिक हुंदळेकर (कोवाडे), संजय देसाई, सतीश देसाई (दाभेवाडी), शामराव गिलबिले, संदिप गिलबिले, परसु रामू कातकर (हाजगोळी बुद्रक) व पेद्रेवाडीतील काही शेतकऱ्यांचे नुकसान गव्याच्या कळपाने केले आहे.

कोट-
गव्याकडून सातत्याने नुकसान होत असल्याने शेती संकटात आला आहे. वन्यप्राण्यांकडून झालेल्या पिकांची नुकसानभरपाई दुप्पट मिळावी. पंचनामे वेळेत व्हावेत.
- परसु कातकर, शेतकरी, हाजगोळी बुद्रक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com