पाच तोळ्यांचे दागिणे लंपास

पाच तोळ्यांचे दागिणे लंपास

साडेचार तोळे दागन्यांसह ट्रॅव्हल्समधून पर्स लांबवली

पुण्यातील प्रवाशाची फिर्याद; अज्ञातावर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता.२४ ः वडिलांच्या निधनानंतर मामाच्या घरी दुःख सावरण्यासाठी येताना प्रवाशाची साडेचार तोळे दागिने असलेली पर्स चोरीस गेली. मध्यवर्ती बसस्थानक परिसरात खासगी ट्रॅव्हल्समधून पर्स लाबंविल्याची फिर्याद शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली. याबाबतची फिर्याद पुण्यातील प्रवासी किशोर आनंदा गुरव यांनी दिली असून, अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस आणि फिर्यादीकडून मिळालेली माहिती अशी ः फिर्यादी गुरव कुटुंबीयांसह पुण्यात राहतात. काही दिवसांपूर्वी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर ते सहकुटुंब आईच्या माहेरी जोतिबा येथे जाण्यासाठी पुण्यातून १९ मार्चला खासगी ट्रॅव्हल्समधून स्वारगेट येथून पुणे-कोल्हापूर खासगी ट्रॅव्हल्समधून कोल्हापुरात आले. मध्यवर्ती बसस्थानक येथे उतरले. चालक-वाहकाशी संवाद साधून ते पुढे जोतिबाकडे निघून गेले. घरी पोहोचल्यानंतर दुःख सावरण्यासाठी त्यांच्या घरी नातेवाईक-मित्र मंडळींनी गर्दी केली. त्यामध्ये त्यांचे दोन दिवस दुःखात गेले. परत पुण्याला जाण्यासाठी २२ मार्चला त्यांनी बॅग भरली. यावेळी दागिने आणि रोख रक्कम असलेली पर्स नसल्याचे दिसून आले. यानंतर पर्स नेमकी कोठे विसरली असेल याचा विचार केल्यानंतर खासगी ट्रॅव्हल्समधून उतरताना पर्स सीटच्या बाजूला ठेवल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात याची फिर्याद दिली.
---------------
पर्स सापडली, पण....
तपकिरी रंगाची पर्स होती. तिच्यात सुमारे दोन लाख ३५ हजार पाचशे रुपयांचा ऐवज होता. यामध्ये सोन्याचे अडीच तोळ्यांचे पट्टी व साखळीचे गंठण, दीड तोळ्याचे सोन्याचे गंठण, अर्धा तोळ्याची अंगठी आणि सुमारे १५ हजार पाचशे रुपये रोख रक्कम होती. याबाबत चालक, क्लिनर, मालक आणि संबंधितांकडे पोलिसांकडून चौकशी सुरू झाली आहे. पर्स मिळाली आहे. मात्र त्यातील दागिने आणि रोकड नसल्याची माहिती फिर्यादी किशोर गुरव यांनी दिली
.....

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com