क्षयरोगाचे समूळ उच्चाटन

क्षयरोगाचे समूळ उच्चाटन

क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करूया ः चव्हाण

कोल्हापूर, ता. २४: कोल्हापूर जिल्ह्यातून क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करुन २४ मार्च हा दिवस क्षयरोग विजय दिवस म्हणून साजरा करण्यासाठी सज्ज राहूया, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले. जागतिक क्षयरोग दिनानिमित्त शाहू स्मारक भवन येथील कार्यक्रमात ते बोलत होते.
जिल्हा क्षयरोग आधिकारी डॉ. उषा कुंभार म्हणाल्या, ‘जिल्ह्यात २०१५ मध्ये एक लाख लोकसंख्यमागे ८६ लोकांना क्षयरोग होता. त्या २०२५ मध्ये ४२ पर्यंत कमी करण्याचा उद्देश आहे. २०१५ मध्ये ४.२ मृत्युदर होता, तो आता एक लाख लोकसंख्येमागे ३ इतका कमी झाला आहे.
दरम्यान, २०१९ च्या पूरपरिस्थितीत डॉ. चंद्रकांत कणसे यांनी केलेल्या मदत कार्याबद्दल त्यांचा सपत्नीक गौरव करण्यात आला. क्षयरोग निर्मूलनात उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था, क्षयरोग पथक राधानगरी तालुका युनिट प्रथम क्रमांक, गारगोटी द्वितीय, गगनबावडा तृतीय क्रमांक पटकावला. उत्कृष्ट ग्रामीण रुग्णालय म्हणून मलकापूर, उत्कृष्ट प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणून तारळे, क्षयरोग निर्मुलन प्रीमियम लीग २०२३ विजेता कोल्हापूर ग्रामीण, उत्कृष्ट खाजगी वैद्यकिय व्यावसायिक कुरडे चिल्ड्रन्स हॉस्पिटल प्रथम क्रमांक जयसिंगपूर, श्री. स्वामी समर्थ हॉस्पीटल इचलकरंजी द्वितीय क्रमांक, जयसिंगपूर येथील चौधरी हॉस्पिटल तृतीय क्रमांक पटकावला आहे.
उत्कृष्ट खासगी औषध विक्रत्यांमध्ये (व्यावसायिक) महादेव मेडिकल (इचलकरंजी), क्षयरोग जनजागृतीपर आशा स्वयंसेविका वक्तृत्व स्पर्धा २०२३ मध्ये अनुराधा ढेरे, कडगाव (ता.भुदरगड) प्रथम, सीमा पाटील, घालवाड (ता. शिरोळ ) द्वितीय, भाग्यश्री कांबळे (हेर्ले) तृतीय क्रमांक पटकाविला. क्षयरोग जनजागृतीपर आरोग्य कर्मचारी यांच्या म्हणी व घोषवाक्य स्पर्धेमध्ये एस.आर.कांबळे (एम.पी.डब्लू.) प्रथम, मनीषा कुंभार (ए.एन.एम.), द्वितीय क्रमांक, संदीप सरंजामे (एम.पी.डब्लू.), तृतीय क्रमांक पटकावला. समुदाय आरोग्य अधिकारी (सी.एच.ओ.) यांच्या क्षयरोग जनजागृतीपर पोस्टर स्पर्धेत सपना माने प्रथम, डॉ.विनिता जाधव द्वितीय, डॉ.निकिता मोहोले तृतीय क्रमांक व रोहन भावके तृतीय क्रमांक (विभागून) यांना गौरविले.
मधुमेह तज्ज्ञ डॉ.चंद्रकांत कणसे, डॉ. सरस्वती कणसे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एस.बी.थोरात, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय राजवीर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या टीबी ऍण्ड चेस्ट विभाग प्रमुख डॉ.अनिता सैब्बनावार, डॉ.मानसी कदम, डॉ,विनायक भोई, डॉ.मोहन पोतदार, दीपा शिपुरकर, डॉ. नितीन कुंभार उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com