बाजार समिती

बाजार समिती

लोगो- बाजार समिती
-
रेंगाळलेली प्रकरणे पुन्हा चर्चेत
माजी संचालक नाथाजी पाटील, काटेंची फेरचौकशीची मागणी; समितीला कारणे दाखवा नोटीस

शिवाजी यादव ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर ,ता. २४ ः शेती उत्पन्न बाजार समितीत तीन वर्षापूर्वी झालेल्या बेकायदा नोकर भरती प्रकरण व बेकायदा पायाभूत सुविधा कामाची फेरचौकशी करावी, अशी मागणी बाजार समितीचे माजी संचालक नाथाजी पाटील व भगवान काटे यांनी जिल्हा निबंधकांकडे केली आहे. त्यानुसार बाजार समितीला कारणे दाखवा नोटीस मिळाली आहे. त्यामुळे मध्यंतरीच्या काळात रेंगाळलेली प्रकरणे पुन्हा चर्चेत आली आहेत.
समितीत २०१८-१९ या कालावधीत असलेल्या संचालक मंडळाने २९ जणांची नोकर भरती केली होती. यासाठी काढलेल्या जाहिरातीवरून राज्यभरातून जवळपास ४ हजारांवर उमेदवारांचे अर्ज आले होते. मात्र, त्यांचा अपवाद वगळता फारसा विचार न करता जवळच्या नातेवाईकांची नोकरभरती केली. यात काही उमेदवारांची खोटी कागदपत्रे तयार केली. त्यानंतर हे कर्मचारी वर्षेभर समितीकडे काम करीत होते असे दाखवण्यासाठी त्यांचे व्हाऊचवर वेतन काढण्यात आले. त्याचा ३६ लाख ६६ हजार रूपये खर्चाचा बोजा समितीवर पडला होता. या प्रकरणाची चौकशी करावी असे एक निवेदन आहे, तर दुसऱ्या निवेदनात बाजार समितीतील पायाभूत सुविधांमध्ये महापालिकेचा लेआऊट मंजूर नसताना ही बेकायदा गाळे बांधकाम केले, त्या गाळे धारकांकडून अनामत रक्कम उकळली. समितीच्या खर्चातून खासगी व्यक्तींवर जेवणाचा खर्च करण्यात आला, मार्केट यार्डातील बोळ विक्रीस काढले, खासगी कंपनीला नाममात्र भाडेपट्टीवर जागा देण्याचे करार करण्यात आला, अशा अनेक तक्रारी होत्या.
तीन वर्षापूर्वी याच माजी संचालकांनी तक्रारी केल्यानंतरच जिल्हा निंबधक कार्यालयाकडून चौकशी झाली. त्यात चौकशीत संबंधित संचालक मंडळातील गैरकारभारावर शिक्कामोर्तोबत झाले. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. पुन्हा प्रकरण पणन संचालककडे आले व बाजार समिती झालेल्या गैरव्यवहाराची जबाबदारी निश्चित होऊन संबधितांकडून ज्या रक्कमची वसुली व्हायला हवी होती ती झाली नाही. या दोन्ही अर्जामुळे रेंगाळलेली प्रकरणे पुन्हा चर्चेत आली आहेत.

चौकट
बाजार समितीत उत्सुकता
राज्यात भाजप- शिवसेनेची सत्ता आली. या गैरव्यवहरातील सहभागीपैकी दोन संचालक राष्ट्रवादीकडे तर एक माजी संचालक शिवसेनाकडे गेले आहेत. या गैरव्यहाराच्या चौकशीची मागणी करणारे भाजपचे पदाधिकारी आहेत. त्यामुळे चौकशीचे प्रकरण कसे धसास लागेल याबाबत बाजार समितीत उत्सुकता आहे.

कोट
जिल्हा निबंध कार्यालयाकडे बाजार समितीच्या मागील संचालक मंडळाच्या काळातील काही व्यवहारिक बाबींविषयी तक्रारींचे निवेदन सादर झाले होते. त्या अनुषंगाने जिल्हा निबंधक कार्यालयाकडून बाजार समितीला विचारणा करणारे पत्र मिळाले आहे.
-जयवंत पाटील, सचिव, बाजार समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com