डिगे फाउंडेशन, जयंती समितीतर्फे
११ एप्रिलपासून भीम फेस्टिव्हल

डिगे फाउंडेशन, जयंती समितीतर्फे ११ एप्रिलपासून भीम फेस्टिव्हल

डिगे फाउंडेशन, जयंती समितीतर्फे
११ एप्रिलपासून भीम फेस्टिव्हल
कोल्हापूर, ता. २५ : माजी खासदार एस. के. डिगे मेमोरियल फाउंडेशन आणि विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त ११ ते १४ एप्रिल रोजी भीम फेस्टिव्हलचे आयोजन केले आहे, अशी माहिती डिगे फाउंडेशनचे अध्यक्ष सदानंद डिगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डिगे म्हणाले, ‘‘११ एप्रिल रोजी महात्मा जोतिबा फुले यांच्या १९६ व्या जयंतीनिमित्त बिंदू चौकात सकाळी नऊ वाजता प्रा. महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात येईल. सायंकाळी सहा वाजता बिंदू चौकात भीम फेस्टिव्हलचे उद्‌घाटन आमदार जयश्री जाधव, आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते होईल. आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते क्रांतीबा फुलेवाडा या भव्य प्रतिकृतीचे उद्‌घाटन होईल. डॉ. सुजित मिणचेकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.
१२ एप्रिलला सायंकाळी पाच वाजता शाहु स्मारक भवनात डॉ. सुरेंद्र जोंधळे यांचे ‘विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लोकशाही विचाराची समकालीन प्रस्तुतता’ यावर व्याख्यान होईल. डॉ. हरिष भालेराव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. १३ एप्रिलला ‘समाजरत्न भीम क्रांती’ पुरस्कार सोहळा दुपारी तीन वाजता शाहु स्मारक भवन येथे प्रा. डॉ. अक्षता गावडे यांचे हस्ते होईल. प्रा. डॉ. सुवर्णा यादव अध्यक्षस्थानी आहेत.
निलोफर आजरेकर, विद्यालक्ष्मी राजहंस, हेमलता कुर्डुकर, मनिषा घरपणकर, प्रा. डॉ. यशोधरा वराळे, छाया वर्धन, स्वाती काळे, प्रा. अनिजा सुर्यवंशी यांना ‘समाजरत्न पुरस्कार’ प्रदान केला जाईल. बिंदु चौकात रात्री १२ वाजता प्रबोधनात्मक आतषबाजी होईल. उत्तम कांबळे, प्रा. शहाजी कांबळे यांच्या हस्ते याचे उद्‌घाटन होईल. १४ एप्रिलला बिंदु चौक येथे डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांचे हस्ते सकाळी नऊ वाजता होईल. यानंतर दुपारी १२ वाजता अंध, अपंग मुलांना भोजनदान दिले जाईल. सायंकाळी चार वाजता मिरवणुकीत सहभाग राहील.’’
या वेळी कार्याध्यक्ष धोंडीराम कांबळे, संचालक प्रभाकर कांबळे, अशोक भास्कर, सचिव महादेव कांबळे, हेमंत कांबळे, योगेश डिगे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com