मोदी पुतळा दहन

मोदी पुतळा दहन

91380

इचलकरंजी ः राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याप्रकरणी महाविकास आघाडीतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. (पद्माकर खुरपे ः सकाळ छायाचित्र सेवा)

महाविकास आघाडीतर्फे
मोदींच्या पुतळ्याचे दहन
इचलकरंजी, ता.२५ ः न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे खासदारपद रद्द झाले. त्याचे तीव्र पडसाद आज शहरात उमटले. महाविकास आघाडीच्यावतीने मलाबादे चौकात तीव्र निदर्शने केली. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. प्रदेश काँग्रेसचे सचिव शशांक बावचकर यांच्यासह आघाडीतील घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी मोदी सरकारवर कठोर शब्दांत हल्लाबोल केला. आंदोलनात मदन कांरडे, विठ्ठल चोपडे, प्रताप होगाडे, संजय कांबळे, राहुल खंजिरे, अमित गाताडे, बाबासो कोतवाल, भरमा कांबळे, सदा मलाबादे, महादेव गौड, सयाजी चव्हाण, प्रमोद खुडे, अजित मिणेकर, महेश बोहरा, ताजुद्दीन खतीब, समीर जमादार, मलकारी लवटे आदी सहभागी झाले होते. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला होता.
....................

91381
इचलकरंजी ः भाजपच्यावतीने राहुल गांधी यांच्या विरोधात शनिवारी मलाबादे चौकात निदर्शने करण्यात आली.

भाजपची राहुल गांधींविरोधात
इचलकरंजीत जोरदार निदर्शने
इचलकरंजी, ता.२५ ः काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाचा अवमान केल्याच्या निषेधार्थ भाजपच्यावतीने मलाबादे चौकात जोरदार निदर्शने केली. यावेळी कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्यासह महाविकास आघाडीविरोधात घोषणाबाजी केली. शहराध्यक्ष अनिल डाळ्या यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. आंदोलनात अमर कांबळे, अरविंद शर्मा, ॲड. भरत जोशी, अरुण कुंभार, प्रवीण पाटील, उमाकांत दाभोळे, रामदास कोळी, बाळकृष्ण तोतला, विनोद कांकाणी, बाबासो कोरे, प्रमोद बचाटे, अर्जुन सुतार, पूनम जाधव, योगिता दाभोळे, नागुताई लोंढे, शबाना शाह, महेश पाटील, अरविंद चौगुले, हेंमत वरुटे, सचिन माळी, आंबा बनसोडे, अलीखान आदी सहभागी झाले होते.
..................

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com