सायबर महाविद्यालय कार्यशाळा

सायबर महाविद्यालय कार्यशाळा

९१६१५
कोल्हापूर : सायबर महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीय परिषदेच्या समारोपप्रसंगी दिवाकर बेडेकर यांनी मार्गदर्शन केले. या वेळी मान्यवर उपस्थित होते.

तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर व्हावा
दिवाकर बेडेकर;‘सायबर’मध्ये राष्ट्रीय परिषदेचा समारोप
कोल्हापूर, ता. २६ : तंत्रज्ञान हे वास्तविक पाहता समतोल विकास साधण्यासाठी वापर केला जाणे अपेक्षित असते. अन्यथा या सर्व प्रक्रियेत मानवी चेहरा हरवून जाण्याची शक्यता आहे. कोणत्याही क्षेत्रात कार्य करणे हे आव्हानात्मक बनत चालले असून याला तोंड देण्यासाठी योग्य ते नियोजन सातत्यपूर्ण परिश्रम व विविध घटकांसोबत समन्वय साधणे गरजेचे आहे. तसेच प्रगत तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर करावा, अशी अपेक्षा नरिशिंग फार्मचे मुख्य कार्यकारी संचालक दिवाकर बेडेकर यांनी व्यक्त केली. ते सायबर महाविद्यालयात आयोजित ‘नव्या जागतिक क्रमवारीत भारत’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या समारोप प्रसंगी बोलत होते.
सायबरचे कार्यकारी विश्‍वस्त व सचिव डॉ. आर. ए. शिंदे यांनी शिक्षण संस्थामधून जबाबदार युवकांची फळी घडवण्याचे काम केली जाण्याची अपेक्षा व्यक्त केली. विश्‍वस्त ऋषिकेश शिंदे यांनी सायबर महाविद्यालयातर्फे राबवण्यात येणार असलेल्या विविध उपक्रमांविषयी माहिती दिली. दोन दिवसीय परिषदेचा आढावा डॉ. रजनी कामत यांनी घेतला. डॉ. किशोरकुमार यांनी विविध संशोधन पेपरच्या सारांश रित्या मांडणी केली. डॉ. पूजा पाटील व डॉ. अजय शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. आर. पी. जोशी (पारिजात) यांनी मानले. या वेळी किट विद्यापीठाचे प्रा. डॉ. विश्‍वजित दास पारूल, प्रा. डॉ. यशवंत सिंग, आय. आय.टी.मुंबई चे प्रा. डॉ. शाम आसोलकर, सायबरचे संचालक डॉ. एम. पी. रथ व सिल्वर ओक विद्यापीठ गुजरातचे डॉ. समीर गोपालन, डॉ. दुर्गेश वळवी, प्रा. स्नेह नागावकर उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com