खंडपीठ निवेदन

खंडपीठ निवेदन

91628

सर्किट बेंचबाबत दहा दिवसांत मुंबईत बैठक
खासदार श्रीकांत शिंदे; खंडपीठ कृती समितीने दिले निवेदन

कोल्हापूर, ता. २६ ः उच्च न्यायालयाच्या कोल्हापुरातील सर्किट बेंचसाठी दहा दिवसांत पालकमंत्र्यांसह संबंधित घटकांची मुंबईत बैठक घेऊन यावर तोडगा काढू, असे आश्‍वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी खंडपीठ कृती समितीच्या शिष्टमंडळाला दिले.
श्री. शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर होते. खासदार प्रा. संजय मंडलिक यांच्या निवासस्थानी खंडपीठ कृती समितीने त्यांची भेट घेऊन निवेदन दिले. खासदार धैर्यशील माने उपस्थित होते. खंडपीठ कृती समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. गिरीश खडके यांनी श्री. शिंदे यांचा सत्कार केला.
कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर जिल्ह्याकरिता कोल्हापूर येथे सर्किट बेंच मागणी ३५ वर्षे सुरू आहे. कोल्हापूर सर्किट बेंच मागणी लढा आता अंतिम टप्‍प्यात आहे. मुख्य न्यायमूर्ती यांचे जुलै २०२२ मध्ये खंडपीठ कृती समितीस आलेल्या पत्रामध्ये मुख्यमंत्री यांच्याबरोबर बैठक झाल्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंचबाबत निर्णय घेतला जाईल असे नमूद केले आहे. त्यामुळे आपण उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती व मुख्यमंत्री यांची भेट घडवून आणावी, असे ॲड. खडके यांनी सांगितले. कोल्हापूर सर्किट बेंच हा सहा जिल्ह्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. लोकांना जलद व स्वस्त न्याय मिळण्यासाठी कोल्हापूर येथे सर्किट बेंच होणे गरजेचे आहे असल्याचे खासदार प्रा. मंडलिक व श्री. माने यांनी सांगितले. या शिष्टमंडळात समितीचे सचिव अ‍ॅड. विजयकुमार ताटे-देशमुख, कोल्हापूर सहकार बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. इंद्रजित चव्हाण, जिल्हा बार असोसिएशनचे सहसचिव अ‍ॅड. संदीप चौगुले, लोकल ऑडिटर अ‍ॅड. संकेत सावर्डेकर उपस्थित होते.

चौकट
प्रादेशिक योजनेबाबत निवेदन
कोल्हापूर आर्किटेक्ट व इंजिनिअरींग असोशिएशनच्यावतीने कोल्हापूर शहराच्या प्रादेशिक योजनेबाबत श्री. शिंदे यांना निवेदन देण्यात आले. कोल्हापूर प्रादेशिक योजनेतील त्रुटी संदर्भात त्रिसदस्यीय समितीचा अहवाल मंजूर करून लागू करावी, वर्ग दोन प्रकारातील जमिनी वर्ग एकमध्ये रूपांतरीत करण्यासाठी २०१९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या अधिसुचनेला मुदतवाढ द्यावी अशी मागणी या निवेदनात केली आहे. शिष्टमंडळात अजय कोराणे, क्रेडाईचे के. पी. खोत, अनिल घाटगे, विजय पाटील यांचा समावेश होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com