मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्ज वसुलीसाठी महिलांची नेमणूक

मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्ज वसुलीसाठी महिलांची नेमणूक

मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून
कर्ज वसुलीसाठी महिलांची नेमणूक
वादावादी, पोलिस तक्रार टाळण्याचा प्रयत्न; अपेक्षित वसूलीही
इचलकरंजी, ता. २६ : मायक्रो फायनान्स कंपनी एजंटांकडून कर्जाचे हप्ते वसूल करण्यासाठी कर्जदारांच्या मागे तगदा लावत असल्यामुळे अनेक वेळा वादावादीचे प्रसंग उद्‍भवतात. त्यातून हाणामारीचे प्रकारही घडताना दिसतात. असे प्रकार टाळण्याठी व वसुलीही होण्यासाठी मायक्रो फायनान्स कंपन्या कर्जाचे हप्ते महिलांमार्फत वसूल करून घेत असल्याचे समोर येत आहे. महिला वसुली अधिकाऱ्‍सोबत बोलताना मर्यादा पडत असल्यामुळे वादावादीचे प्रमाण कमी होत आहे. परिणामी भविष्यात केवळ महिला वसूली अधिकारी पहायला मिळाल्यास नवल वाटणार नाही.
मायक्रो फायनान्स कंपनीकडून कर्ज मिळण्यासाठी नागरिकांना अधिक धावधाव करावी लागत नाही. एका फोनवर कर्ज बँक खात्यावर जमा होते. त्यामुळे कर्जाचे व्याज दर अधिक असूनही नागरिकांकडून कर्ज घेण्यासाठी पसंती असते. कर्ज घेताना व्याजदरांचा विचार न करणारे नागरिक कर्जाचे हप्ते भरताना मात्र वादावादी करीत असतात. मायक्रो फायनान्स कंपन्याही आपल्या कर्मचाऱ्‍यांना कर्ज किती वर्षापासून थकीत आहे यावर बक्षीस स्वरुपात टक्केवारी देत असतात. त्यामुळे कर्मचाऱ्‍कडून अनेक वेळा कर्जदारांना पठाणी वसुलीची प्रचिती येते. यावरून वादावादी व प्रसंगी पोलिस तक्रारही होते. यावर मार्ग काढण्यासाठी मायक्रो फायनान्स कंपन्या वसूली अधिकारी म्हणून महिलांच्या नेमणूकीचा मार्ग अवलंबताना दिसत आहेत. थकीत वसुलीसाठी महिला अधिकारी दारात आल्याने कर्जदार कर्जाच्या हप्त्यांची जुळणी अगोदरच करून ठेवत आहेत. परिणामी अपेक्षित वसूली मायक्रो फायनान्स कंपन्यांची होताना दिसते.
---------------------
साम, दाम, दंडाचा वापर
महिला बचत गट, ई एम आय वर खरेदी केलेले मोबाइल फोन, मोटार सायकल हप्ते, वैयक्तिक कर्ज तत्काळ मिळत आल्याने कर्जदारांची संख्या वाढत आहे. बहुतांशी मायक्रो फायनान्स कंपनीचे व्याजदर आरबीआयच्या नियमावली बाहेर आल्याने कर्ज वसुलीसाठी न्यायालयाची पायरी न चढता प्रकरण बाहेर मिटवण्याचा प्रयत्न असतो. यासाठी साम, दाम, दंड यांचा वापर करतानाही दिसतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com