‘सुटा’च्या कोल्हापूर जिल्हाअध्यक्षपदी आर. जी. कोरबू

‘सुटा’च्या कोल्हापूर जिल्हाअध्यक्षपदी आर. जी. कोरबू

‘सुटा’च्या जिल्हाअध्यक्षपदी
आर. जी. कोरबू यांची निवज

कार्यवाहपदी गजानन चव्हाण

कोल्हापूर, ता. २६ ः शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाच्या (सुटा) कोल्हापूर जिल्ह्याच्या पदाधिकारी निवडीसाठी आज निवडणूक झाली. त्यात अध्यक्षपदी डॉ. आर. जी. कोरबू, कार्यवाहपदी डॉ. गजानन चव्हाण, उपाध्यक्षपदी प्रा. सयाजी पाटील आणि मानाजी शिंदे यांनी बाजी मारली. खजिनदारपदी प्रा. डॉ. विजय देसाई यांची बिनविरोध निवड झाली.
२०२३-२४ ते २०२४- २५ या कालावधीतील पदाधिकारी निवडीसाठीच्या अंबाई डिफेन्स येथील सुटाच्या कार्यालयात सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान झाले. या निवडणुकीत १६४ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर रात्री साडेआठच्या सुमारास मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाली. या निवडणुकीतील अध्यक्षपदासाठी तिरंगी लढत झाली. त्यात डॉ. कोरबू यांनी १०० मते घेत बाजी मारली. कार्यवाहपदासाठी दुरंगी लढतीमध्ये डॉ. चव्हाण यांनी १४८ मतांसह विजय मिळविला. उपाध्यक्षपदासाठीच्या लढतीत प्रा. पाटील यांनी १२७, तर प्रा. शिंदे यांनी ९९ मतांनी विजय मिळविला. पदनिहाय झालेल्या निवडणुकीत प्रत्येकी एक मत अवैध ठरले. दरम्यान, दर दोन वर्षांनी या पदाधिकारी निवडीसाठी निवडणूक होते. कोरोनामुळे एक वर्ष लांबलेली निवडणूक आज झाली. दरम्यान, नूतन जिल्हाध्यक्ष डॉ. कोरबू गेल्या २५ वर्षांपासून ‘सुटा’मध्ये कार्यरत आहेत. त्यांनी यापूर्वी कोल्हापूर जिल्हा सचिव, सहसचिवपदी काम केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com