मनपाच्या ३४ सफाई कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

मनपाच्या ३४ सफाई कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

मनपाच्या ३४ सफाई कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

इचलकरंजी, ता.२७ ः संप मागे घेतलेल्या दिवशी कामगार गैरहजर असलेल्या ३४ सफाई कर्मचाऱ्यांना प्रत्येकी एक हजार रुपये दंड करण्याचा आदेश महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिला आहे.
जुनी पेन्शन सुरु करण्याच्या मागणीसाठी महापालिका कर्मचारी संपात सहभागी झाले होते. त्यामध्ये अत्यावश्यक सेवा असलेले सफाई कर्मचाऱ्यांचाही यामध्ये सहभाग होता. संप मागे घेतलेल्या दिवशी दुपारी १२ ते सांयकाळी ६ या कालावधीत कामावर हजर राहून स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला होता. या कालावधीत भरारी पथकाने सर्व वॉर्डात जावून गैरहजर सफाई कर्मचाऱ्यांची पाहणी केली. यामध्ये २६ कर्मचारी गैरहजर तर ८ कर्मचारी किरकोळ रजेवर असल्याचे दिसून आले. गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांसह रजेवर असणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई केली आहे. या कर्मचाऱ्यांचे त्या दिवसाचे वेतन कपात करण्यात येणार आहे. याशिवाय पुढील दोन दिवस केलेल्या पाहणीतही ३० सफाई कर्मचारी गैरहजर व रजेवर असल्याचे दिसून आले आहे. त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश आयुक्त देशमुख यांनी दिले असून त्यांचा समाधानकारक खुलासा न आल्यास पुढील कारवाई केली जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com